*आहेरगाव येथील पिता पुत्रांनी महिलेची छेड काढल्याप्रकरणी विनयभंगाचा टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल*
टेंभुर्णी प्रतिनिधी/ माढा तालुक्यातील सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्ग लगत असणारे आहेरगाव येथील एका शेतामधील महिला शेतातील काम करत असताना शेताच्या शेजारील अजित घाडगे यांची शेती आहे२६ एप्रिल२०२२ रोजी दुपारी३:४५ वाजे सुमारास एक महिला तिच्या शेतामध्ये धनोरा पेटवत होती त्यांच्या शेजारी आसणारे शेतकरी अजित रामचंद्र घाडगे रा. आहेरगाव ता. माढा हा शेतामध्ये आला व विनाकारण आमचा ऊस पेटवून दिला असे म्हणून त्या महिलेला हाताला धरून ओडू लागला व तो म्हणाला की तुम्ही पेटवलेल्या धनुऱ्यानेच आमच्या ऊसाला आग लागली आहे. माझा ऊस भरून दे असे म्हणून शिवीगाळी करून त्या महिलेकडे आला व हात धरला त्यामुळे महिलेच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले आहे. तसेच त्यानंतर त्याचा भाव सुरेश रामचंद्र घाडगे व त्याचे वडील रामचंद्र घाडगे दोघे रा. आहेरगाव ता. माढा जि.सोलापूर यांनी महिलेला शिवीगाळ दमदाटी केली. अशा आशयाची फिर्याद त्या महिलेने टेंभुर्णी पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. पुढील तपास टेंभुर्णी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली.ए.पी.आय. सुशिल.भोसले , पो. भानवसे करीत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा