सुगाव सेवा सहकारी सोसायटीवर शेतकरी विकास पॅनलचा दणदणीत विजय
नांदेड जिल्हा प्रतिनिधी
बालाजी सिरसाट
लोहा : लोहा तालुक्यातील सुगाव येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या अटीतटीच्या झालेल्या निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलने दणदणीत विजय मिळवला.एकूण बारा पैकी दहा जागा मोठ्या फरकाने जिंकून ही सोसायटी ताब्यात घेतली आहे.
सोसायटीच्या या निवडणुकीत शेतकरी परिवर्तन विकास पॅनलचा धुव्वा उडाला.तर शेतकरी विकास पॅनेलने दणदणीत विजय मिळवला आहे. त्यामुळे गुलाल उधळत ढोल ताशाच्या गजरात जल्लोष करून मिरवणूक काढून विजय साजरा करण्यात आला.
विजयी पॅनलचे प्रमुख प्रदीप पाटील सावळे सुभाष पाटील शिंदे गणेश पाटील सावळे सुभाष गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली वि.का.सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक लढविण्यात आली.ह्या निवडणूकीसाठी मतदानाला रविवारी दिनांक-२३ रोजी सकाळी ८ पासून सुरुवात झाली.तर मतमोजणी सायंकाळी पार पडली.त्यात शेतकरी विकास पॅनलचे १२ पैकी १० सदस्य निवडून आले.विजयी उमेदवार व त्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत- कदम हरिनाम तातेराव (२७३) घाटोळ रावसाहेब किशन (२७६) जाधव मनोहर दिगंबर (२६०) ढाले काशिनाथ गोविंदा (२६८) शिंदे अंबुबाई बळवंतराव (२६७) सावळे खंडू शंकर (२५१) सावळे प्रदीप व्यंकटी (२६८) कपाळे कौशल्याबाई मारुती (२९०) सावळे सविता व्यंकटी (२८९) यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जी.एस.चिल्ले यांनी काम पाहिले तर इतर कर्मचारी यांनी निवडणूक कामात सहकार्य केले.धनंज (खु) धनंज(बु) पिंपळदरी, गोळेगाव व भुकमारी आदी गावातील जवळपास ६०० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी माजी जि.प.सदस्य गणेशराव सावळे,कोंडीबा पाटील ढाले पंडित पाटील कदम,सुभाष गायकवाड,चंदू भुरे राजू पाटील शिंदे रामकिसन जाधव साईनाथ जाधव यांच्यासह गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा