Breaking

रविवार, ८ मे, २०२२

संगणक अभियंता पती-पत्नीचे तुटत असलेला संसार फॅमिली कोर्ट लोक अदालतती मुळे पुन्हा संगणक अभियंता पती-पत्नीचा संसार जुळला व दांपत्यांचे मनोमिलन - एडवोकेट श्रीनिवास कटकुर*


*संगणक अभियंता पती-पत्नीचे तुटत असलेला संसार फॅमिली कोर्ट लोक अदालतती मुळे पुन्हा संगणक अभियंता  पती-पत्नीचा संसार जुळला व दांपत्यांचे मनोमिलन - एडवोकेट श्रीनिवास कटकुर*


 सोलापूर प्रतिनिधी/ सुशीला गायकवाड 


 *सोलापूर** आयटी इंजिनियर पती नितीन वय 27 वर्ष व  बीटेक संगणक अभियंता  पत्नी सौ नेहा वय 24 वर्ष दोघेही उच्चविद्याविभूषित संगणक अभियंता असलेले पती-पत्नी हे हैदराबाद येथे एका मल्टिनॅशनल कंपनी मध्ये संगणक अभियंता म्हणून नोकरीत होते व त्यांचे घटस्फोटकडे जाणारे केस व खटला  माननीय फॅमिली कोर्ट लोक अदालतमुळे व माननीय जिल्हा न्यायाधीश श्रीमान. एस.एस. जगताप साहेब  यांचे समुपदेशनामुळे व अँड. श्रीनीवास कटकुर यांचे सहकार्यामुवे जवळपास तुटण्याच्या मार्गावर असलेला संसार पुन्हा जुळला व  संगणक अभियंता असलेले पती-पत्नीचे पुन्हा मनोमिलन झाले व  लोक अदालतमुळे हे शक्य झाले .


*यात केसची सविस्तर हकीकत अशी की*


 नोव्हेंबर  2020 मध्ये  संगणक अभियंता पती-पत्नीचा विवाह अत्यंत थाटामाटात व  शाही पद्धतीने झाला होता.  लग्नानंतर सहा महिन्यातच वर्क फ्रॉम होम असल्यामुळे सोलापुरातील राहत्या घरात पती-पत्नीमध्ये भांडण तंटा निर्माण होऊन पती व सासरकडील मंडळी पत्नी नेहाचा मानसिक,  शारीरिक व आर्थिक छळ व जाचहाट करण्यास सुरुवात केली व सतत सौ.  नेहा हिचा अपमान करीत होते व शुल्लक कारणावरून शिवीगाळ करणे,  माहेरच्या लोकांनी चांगले मानपन केले नाही व  व्यवस्थित हुंडा दिलेला नाही ,असे टोमणे मारून पती नितीन हा सातत्याने पत्नी सौ.  नेहा हिला शिवीगाळ व  अपमान करून मारहाण करीत असे व तिच्यावर संशय घेऊन तिचा छळ करीत असे. व पत्नी नेहा हिचा कोणत्याही प्रकारे लव,  रिस्पेक्ट, केअर करीत नव्हता या सर्व छळास   कंटाळून पत्नी सौ.नेहा ही  सोलापुरातील प्रसिद्ध विधिज्ञ एडवोकेट श्रीनिवास कटकुर यांच्यामार्फत पती नितीन  विरुध्द सोलापूर येथील माननीय. कौटुंबिक न्यायालय यांचे कोर्टात हिंदू विवाह कायदा 1955 कलम 13 (1)( i) (a) या कलमान्वये पत्नीसौ. नेहा ही घटस्फोट मिळण्यासाठी पतीविरुद्ध दोनच महिन्यापूर्वी मे. कौटुंबिक न्यायालयात याचिका दाखल केली होती व दरम्यान दिनांक 7 मे 2022 रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन माननीय कौटुंबिक न्यायालयामार्फत करण्यात आला होता व याकामी पॅनल प्रमुख म्हणून जिल्हा न्यायाधीश श्रीमान एस. एस. जगताप साहेब हे होते , यावेळी संगणक अभियंता असलेले पती-पत्नी या दोघांचा माननीय न्यायाधीश श्रीमान s.s. जगताप साहेब व तसेच आणि पत्नी सौ. नेहा यांचे तर्फै अँडवोकेट. श्रीनिवास कटकुर या दोघांनी या उच्चविद्याविभूषित संगणक अभियंता असलेले पती-पत्नीचे समुपदेशन करून उभय पक्षकार मध्ये झालेला गैरसमज दूर करून दोघा पती-पत्नीला विवाहाचे व संसाराचे  महत्व पटवून देऊन व दोघा कुटुंबीयांचे व त्यांच्यावर होणारा परिणाम व तसेच पती-पत्नी यांच्या पुढील आयुष्यात व तसेच त्यांच्या जीवनावात या घटस्फोट पासून होणारा दुष्पपरिणाम याबाबत दोघा पती-पत्नीचे ब्रेन वॉशिंग करून व मनपरिवर्तन करुन पुन्हा नव्याने एकत्र संसार करणेबाबत पटवुन व समजावुन सांगितले व  दोघेही पती-पत्नी  माननीय न्पायाधीश साहेबांसमोर दोघा पती-पत्नीमध्ये झालेली चूक दोघांनी  मान्य करून यापुढे भविष्यात व आयुष्यात चांगल्या गुण्यागोविंदाने व आनंदाने संसार करण्याचे वचन व हमी मे. कोर्टास दिले व दोघेही संगणक अभियंता असलेले पती-पत्नीचे या  लोकअदालती मुळे  मन परिवर्तन करून   तुटत चाललेला संसाराचे  रूपांतर  उभय पती पत्नीचे   आयुष्याला चांगले पॉझिटिव कलाटणी  दोघा पती-पत्नीचे वैवाहिक आयुष्यात या लोकअदालती मुळे त्यांच्या विवाहास व  आयुष्याला नवसंजीवनी मिळाली व या लोक अदालतीमुळे जवळपास तुटत चाललेला संसार पुन्हा जुळण्यास मदत झाले .

*या लोक अदालतीमध्ये पॅनल प्रमुख म्हणून माननीय जिल्हा न्यायाधीश श्रीमान एस. एस जगताप साहेब होते तर या संगणक अभियंता  पत्नीचे विधीज्ञ  म्हणून एस .के. लाँ असोसिएटसचे  एडवोकेट श्रीनिवास कटकुर , एडवोकेट किरण कटकुर,  एडवोकेट आनंद सागर यांनी काम पाहिले*



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा