भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती महोत्सवानिमित्त रुई येथे सर्व रोग निदान मोफत शिबिराचे आयोजन
प्रतिनिधी इंदापूर/शशिकांत सोनटक्के
भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाचे सचिव व कोल्हापूर जिल्ह्याचे प्रभारी आकाश कांबळे यांनी या शिबिराचे आयोजन केले होते.
या शिबिराचे उद्घाटन भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा चे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख माऊली काका चवरे यांच्या हस्ते करण्यात आले.
यामध्ये कॅन्सरची तपासणी, हार्ट ची तपासणी, इसीजी काढणे, मेंदूचे विकार, बायपास शस्त्रक्रिया, एन्जोप्लास्टी, ऍन्जिओग्राफी, मोतीबिंदू शिबिर, तिरळेपणा, उच्च रक्तदाब, चक्कर व यांसारख्या विविध आजारांवर ती ट्रीटमेंट करून मोफत उपचार करण्यात आले. यामध्ये साधारण फुलदाणी पंचक्रोशीतील मोठ्या प्रमाणामध्ये तरुणांनी सहभाग घेतला होता. अशा प्रकारचे मोफत आरोग्य शिबिरे घेऊन गोरगरिबांची सेवा गेली अनेक वर्षे आकाश कांबळे करीत असतात अशा प्रकारचे गौरवोदार माऊली चवरे यांनी काढले.
यावेळेस सेवासदन लाइफ लाइन, अॕन्को लाईफ सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल मिरज, कॅन्सर हॉस्पिटल शेंद्रे हॉस्पिटल ती सहभाग घेत त्यांचे विविध डॉक्टर याठिकाणी उपस्थित होते. यावेळी सायंकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य दिव्य स्वरुपामध्ये मिरवणूक काढण्यात आली.
यावेळी वालचंद नगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बिरप्पा लातुरे साहेब व पोलिस उपनिरीक्षक अतुल खंदारे साहेब यांनी भेट दिली. यावेळी रुई आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ, भिमराव प्रतिष्ठानचे कार्यकर्ते,गावातील पदाधिकारी देखील मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा