कुर्डुवाडी शहरातील महात्मा गांधी चौक आज सर्वांनी आदर्श घेण्यासारखा सर्वधर्मसमभावाचे प्रतीक बनल्याने सर्वत्र एक चर्चेचा विषय झाला आहे.
कुर्डुवाडीच्या मध्यवर्ती गांधी चौकात मुस्लिम समाजाची जामा मस्सीद् आहे.या मशीदीला लागूनच अवघ्या पंचवीस फूटावर जयंती निमित्ताने महात्मा बसवेश्वर पुतळा व्यासपीठावर विराजित करुन सार्वजनिक जयंती उत्सव उत्साहात साजरी झाली.
याच गांधी चौकात अवघ्या पन्नास फूटावर दक्षिण मुखी हनुमानाचे मंदिर आहे.आज मंगळवार दिवसभरात हनुमानाचे मंदिरात पूजा अर्चा आरती नित्य नियमाने साजरी झाली.
सर्वसमभावाचा संदेश देणा-या व चौकातच असणा-या महात्मा गांधींच्या पुतळ्याच्या साक्षिने ईद, बसवेश्वर जयंती,हनुमान मंदिर पूजा विना अडथळा भेदभाव न ठेवता यथासांग पार पडली.
ना मस्सीदीच्या भोंग्याच्या आवाजाचा अडथळा आला...ना बसवेश्वर जयंती उत्सवाची आडखाटी झाली...ना हनुमान मंदीराच्या नित्य पूजेची बाधा झाली...
ईद निमित्त भर चौकात हिंदू मुस्लिम बांधव हातात हात देऊन व गळाभेट घेऊन शुभेच्छा देत होते.तर मुस्लिम बांधव बसवेश्वर जयंती व्यासपीठावर पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत होते.
तर हनुमान मंदिरत हिंदू मुस्लिम बांधव दर्शन घेत होते.हेही सर्व महात्मा गांधी पुतळ्याच्या साक्षिने.
भोंगा अन् हनुमान चालीसा च्या पार्श्वभूमीवर या सर्व घटनेची नागरिकांमध्ये दिवसभर व रात्री उशिरापर्यंत चर्चा सुरू होती.असा एकत्रित प्रकार महाराष्ट्रा बरोबरच देशात कोठेही पहावयास मिळाला नसेल.
कुर्डुवाडी शहराला जातीयतेचा मागमूसही नाही.इतिहासात केव्हाच जातीय तणाव अथवा दंगल झालेली नाही.अठरा पगड जातीच्या शहराला मुंबईच्या धर्तीवर रेल्वेमुळे कुर्डुवाडीला काॅस्माॅपाॅलीटीन सिटी म्हणून संबोधले जाते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा