वरूडच्या लालासो माने-पाटीलांचा उपक्रम कौतुकास्पद
वडूज प्रतिनिधी / शरद कदम
खर तर पोहणे हा उत्तम व्यायाम मानला जातो. निरोगी आरोग्यासाठी पोहण्याचा व्यायाम उपयुक्त समजला जातो. शहरांच्या मानाने ग्रामीण भागात पोहण्याचे पुरेसे प्रशिक्षण मिळत नाही. पोहायला येत नसल्याने दुर्घनेत अनेकांचे बळी देखील जातात. मात्र ग्रामीण भागातील मुले विशेषतः मुलींना पोहता यावे यासाठी खटाव तालुक्यातील वरूड सोसायटीचे संचालक, माजी सरपंच लालासो माने-पाटील यांनी गावातील व परिसरातील मुला-मुलींना पोहता यावे म्हणून कारी नावाच्या शिवारातील विहिरीमध्ये २० ते २५ मुला-मुलींना पोहवायला शिकविण्याचे धडे दिले. त्यांनी ८ ते १० दिवसामध्ये १५ ते १८ मुला-मुलींना पोहवायला शिकवले आहे. विहिरीमध्ये पोहवायचे धडे देऊन पारंगत केले आहे. पाण्यात असताना कोणतीही दुर्घटना घडल्यावर निदान स्वतःचा जीव वाचवता आला पाहिजे. गावातील मुला-मुलींना पोहता आले पाहीजे म्हणून माने-पाटील यांनी हा उपक्रम हाती घेतला आहे. माने-पाटील यांचे हे कार्य इतरांसाठी प्रेरणादायी असून परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे.
वरूड - येथे मुला-मुलींना पोहायला शिकविताना लालासो माने-पाटील.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा