*अचलेर येथील विद्या विकास हायस्कूल शाळेच्या अध्यक्षपदी अनिल सोमवंशी तर सचिवपदी पृथ्वीराज पाटील यांची निवड*
अचलेर
*लोहारा तालुक्यातील अचलेर येथील विद्या विकास हायस्कूल शाळेच्या अध्यक्षपदी अनिल सोमवंशी तर सचिवपदी पृथ्वीराज पाटील यांची निवड करण्यात आली .*
*तसेच उपाध्यक्ष पदी श्रीमंत मदने ,सहसचिव पदी डॉ दत्तात्रय पाटील , कोषाध्यक्ष पदी मधुकरजी पराळकर यांची एकमताने निवड झाली तसेच नुतन संचालक म्हणून राम चंदनशिवे , राजेंद्र पाटील , बंडूसिंग गहिलोत , यांची निवड झाली . तसेच मुख्याध्यापक भास्कर बेंडगे , शिक्षक प्रतिनिधी संचालकपदी संतोष सोलंकर , व शिक्षकेतर कर्मचारी प्रतिनिधी संचालक म्हणून शरणाप्पा सुतार यांची निवड यावेळी करण्यात आली .*
*यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस .सी बनसोडे .तसेच राम ढेरे , सदानंद कल्याणी यांनी काम पाहिले .*
*या निवड झालेल्या सर्व नुतन पदाधीकाऱ्यांचे अचलेर ग्रामस्थांच्या तर्फे सत्कार करण्यात आले .व त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आले .*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा