Breaking

शुक्रवार, १७ जून, २०२२

यशवंतराव चव्हाण विद्यानिकेतन येथे.प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा*



.*यशवंतराव चव्हाण विद्यानिकेतन येथे.प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा*



*लातूर/ज्ञानेश्वर सूर्यवंशी* :

 लातूर शहरात असलेल्या यशवंतराव चव्हाण विद्यानिकेतन येथे प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
 सर्व प्रथम शिक्षणमहर्षी स्व.शिक्षक आमदार वसंतराव काळे साहेब यांच्या प्रतिमेला प्रशालेच्या आदर्श मुख्याध्यापिका सलीमा सय्यद यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
विद्यार्थ्यांचे पहिले पाऊल शिक्षणासाठी यशवंतराव चव्हाण विद्यानिकेतन लातूर या शाळेत दि.15जून शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना प्रमुखपाहुण्या उषाताई काळे मॅडमच्या हस्ते पाठ्यपुस्तके,पुष्पगुच्छ व गोडखाऊ वाटप करून स्वागत करण्यात आले.तोरण बांधण्यात आले.तसेच पुस्तक दिन सुद्धा साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांना2022-23या शैक्षणिक वर्षातील वर्षभराच्या अभ्यासक्रमाचा आढावा देखील घेण्यात आला.विद्यार्थ्यांनी मी दररोज शाळेत येणार व अविरतपणे शिक्षण घेणार अशी शपथ घेतली.आगळ्यावेगळ्या पद्धतीने विद्यार्थ्यांचे स्वागत केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहर्यावर  आनंद दिसून आला.
शिक्षक आमदार विक्रमजी काळे साहेबांनी नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा सर्व विद्यार्थ्यांना व शिक्षकांना दिल्या.यावेळी लालासाहेब शिंदे,महादेव कांबळे,व्यंकटेश गोरे,सुधाकर होळंबे,इंद्रजित तुरुप,सुरेखा कांबळे,स्वाती आनंदा,पांडुरंग देडे,हरिभाऊ पाडे,चांगदेव कोळी व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा