Breaking

रविवार, १९ जून, २०२२

भादलवाडी सोसायटीवर ती दहा जागांवर विजय मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनलचे वर्चस्व



*भादलवाडी सोसायटीवर ती दहा जागांवर विजय मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनलचे वर्चस्व




 भादलवाडी   /   येथील भादलवाडी विविध कार्यकारी सोसायटीच्या झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत श्री भैरवनाथ सहकार विकास सहकार पॅनलचे दहा उमेदवार विजयी झाले आहेत.भादलवाडी येथील सोसायटीच्या  निवडणुकीसाठी  राष्ट्रवादी  पक्षाच्या पॅनलच्या विरोधात श्री भैरवनाथ विकास पॅनलने उमेदवार उभे केले होते.या झालेल्या अटीतटीच्या निवडणुकीत  भैरवनाथ   विकास पॅनल चे तीन उमेदवार विजयी झाले.मात्र राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनलचे  दहा उमेदवार संचालकपदी मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत.एक उमेदवार बिनविरोध निवड करण्यात आला आहे.राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनलचे विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे-सर्वसाधारण गटातून - प्रविण पाटील,  संदेश कन्हेरकर ,  दीपक खटके, भाऊसो जाधव, शैलेश परकाळे , लाला भंडलकर
महिला प्रतिनिधी- महानंदा  कन्हेर कर  , जयश्री परकाळे  , भटक्या विमुक्त गटातून- बापू भंडलकर  , इतर मागास प्रवर्गातून - हरीभाऊ सुतार हे बिनविरोध विजयी झाले आहेत. तर श्री भैरवनाथ विकास पॅनलचे विजयी उमेदवार सर्व साधारण गटातून  - शिवाजी कन्हेर कर  ,चांगदेव कदम ,  अनुसूचित जाती - जमाती गटातून  - गौतम पिसे 
  राष्ट्रवादी पुरस्कृत  श्री भैरवनाथ सहकार विकास पॅनलचे नेतृत्व - इंदापूर तालुका खरेदी-विक्री संघाचे माजी चेअरमन श्री शिवाजीराव कन्हेर कर [पाटील ]   , भादलवाडी ग्रामपंचायत चे माजी सरपंच श्री प्रविण पाटील ,  बिल्ट कामगार संघटनेचे  माजी अध्यक्ष श्री अजिनाथ कुताळ [ पाटील ] ,भादलवाडी ग्रामपंचायत चे माजी सरपंच  श्री बापु भंडलकर  भादलवाडी सोसायटीचे माजी चेअरमन श्री नाथासो कुताळ व श्री काकासो  परकाळे  आदींनी  केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा