करमाळा तालुक्यातील राजकीय सत्ता केंद्र असणाऱ्या श्री आजिनाथ सहकारी साखर कारखाना अखेर बारामती ऍग्रो कडे
करमाळा प्रतिनिधि aj24taas news
तालुक्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखाना बारामती अॅग्रोला भाडेतत्वार देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. बुधवारी पुणे येथील ऋण वसूली अधिकरण न्यायालयाने आदिनाथ कारखान्याने केलेली याचिका फेटाळली असून बारामती अॅग्रोला दिलासा दिला आहे. सात दिवसाच्या आत हा कारखाना बारामती अॅग्रोला हस्तांतर करणायाचा आदेश न्याधीश दिलीप मुरुमकर यांनी दिला आहे.
करमाळा तालुक्यातील आदिनाथ कारखान्याची पुणे येथे कर्ज वसुली निर्देशणालय न्यायालयात बुधवारी (ता. 29) सुनावणी झाली. सर्वांचे लक्ष लागलेल्या या सुनावणीवेळी बारामती अॅग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे, आदिनाथचे अध्यक्ष धनंजय डोंगरे, अॅड. पांडुरंग देशपांडे आदी उपस्थित होते. कर्ज वसुली निर्देशणालयाचे न्यायाधीश दिलीप मुरुमकर यांच्यासमोर ही सुनावणी झाली. आदिनाथ कारखाना तीन वर्षापसून बंद आहे. दोन वर्षापूर्वी हा कारखना एमएसी बँकेने थकीत कर्ज वसुल न झाल्याने लिलावात कढला होता. त्यामध्ये बारामती अॅग्रोला हा कारखाना भाडेतत्वार देण्यात आला होता. मात्र तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने हस्तांतर रखडले होते.
दरम्यान आदिनाथ बचाव समितीने याबाबत आवज उठवला होता. त्यानंतर संचालक मंडळाने आदिनाथ बचाव समितीच्या मागणीनुसार हा कारखना सहकारी तत्वावरच चालावा व भडेतत्वावर देऊ नये असा ठराव सर्वसाधारण सभेत बहुमताने मंजुर केला होता.
त्यानंतर कारखान्याने एमएससी बँकेच्याविरुद्ध कर्ज वसुली निर्देशणालय न्यायालयात धाव घेतली होती. याबाबत बुधवारी न्यायाधीश मुरुमकर यांच्या
यांच्यासमोर सुनावणी झाली.
बाजार समितीचे माजी संचालक नागेश लकडे, आदिनाथचे माजी संचालक राजेंद्र धांडे, टाकळीचे माजी सरपंच डॉ. गोरख गुळवे, माजी उपसरपंच आदिनथ लाळगे, कात्रजचे माजी अध्यक्ष भारत धायगुडे, टाकळी सोसायटीचे अध्यक्ष संतोष गुळवे आदी उपस्थित होते. अॅड. हर्षल साठे व अॅड. वरुण कुलकर्णी यांनी आदिनाथ कारखान्याकडून तर बारामती अॅग्रोकडून अॅड. आनंद आकुट, अॅड. महेश पेठे व अॅड. खासबासदार यांनी काम पाहिले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा