स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मुलासाठी संजीवनी ठरेल अधिकारी फाउंडेशन
प्रतिनिधी इंदापूर
शशिकांत सोनटक्के
समाज सेवेच्या बाबतीत भारतीय उद्योगपती कुणाही पेक्षा कमी नाहीत गरिबांच्या मदतीसाठी आणि कल्याणकारी देशाचे उद्योगपती नेहमी आघाडीवर राहतात परोपकाराच्या भावनेने ओत प्रोत होऊन बरेच उद्योगपती अनेक वर्षापासुन गरिबांच्या कल्याणासाठी कार्य करत आहेत परंतु समाजसेवाचे कार्य देशाच्या अति दुर्गम ग्रामीण जिथे अतिगरिबी आहे शिक्षण व रोजगाराचा अभाव आहे पायाभूत सुविधांचा अभाव आहे अश्या ठिकाणी गरिबांच्या भल्यासाठी आणि जर कार्य होत असेल तर ते निश्चितच प्रशंसनीय आहे कारण असे मागासलेले अधिवासी आणि ग्रामीण विभागामध्ये समाजसेवेची सर्वात जास्त गरज आहे.
अधिकारी फाऊंडेशन ही एक अशी संस्था आहे जी महाराष्ट्र तील ग्रामीण आणि शहरी भागातील गरीब होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करण्यासाठी समर्पित आहे अधिकारी फाऊंडेशन ही जात पात आणि धर्माच्या वर उठून ग्रामीण आणि शहरी भागात शिक्षण जागरूकता आणि स्वयंरोजगारासाठी काम करत आहे
फाऊंडेशनचे मुख्य कार्य स्पर्धा परीक्षा करणार्या गरीब होतकरू विद्यार्थ्यांना त्याच्या गरजेनुसार मदत करणे आणि त्यांना अधिकारी घडण्यासाठी हातभार लावणे आता च्या घडीला फाऊंडेशन काही गरीब मुलाची मोफत जेवणाची व्यवस्था, राहण्याची व्यवस्था करत आहे स्पर्धा परीक्षा करणार्या मुलाबरोबर अधिकारी फाऊंडेशन इतर फॅकल्टीतील मुलांना देखील आर्थिक मदत करत आहे आताच MBBS च्या दुसर्या वर्षात शिकणारी स्नेहा गावडे या गरीब होतकरू विद्यार्थीनीला तीच MBBS वार्षिक अभ्यासक्रमाची संपूर्ण वर्षाची फी अधिकारी फाऊंडेशन कडून देण्यात आली
अधिकारी फाऊंडेशन संस्थेच्या या रोपट्याला वटवृक्ष बनवण्यासाठी कार्य करणारे फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष उस्मान शेख, संस्थेचे सचिव पत्रकार महेंद्र शेलार, संस्थेचे उपाध्यक्ष अँड समीर मुलाणी (समाजसेवक, मा. उपसरपंच काटेवाडी), विश्वस्त प्राध्यापक अमोल मराडे (JSPM MBA कॅम्पस पुणे ), प्राध्यापक- प्राचार्य विद्या प्रतिष्ठान (VP) कॉलेज सुपा बारामती या सर्वाच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी फाऊंडेशन कार्य करते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा