कृषी खात्याच्या वतीने कृषी सप्ताह निमित्त रावगाव येथे कार्यक्रम संपन्न
करमाळा प्रतिनिधि
तालुक्यातील रावगाव येथे सोमवारी (ता. २७) कृषी संजीवनी मोहिमे अंतर्गत महिला कृषी तंत्रज्ञान सक्षमीकरण दिनानिमित्त कृषी योजना व त्यामध्ये महिला शेतकऱ्यांनी सहभागी होऊन योजना कार्यान्वित करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. पुणे येथील कृषी उपसंचालक यांनी ‘महिलांनी जास्तीत जास्त शेती व पूरक व्यवसायांमध्ये लक्ष घालून कृषी विषयक योजनेचा संधी म्हणून उपयोग केल्यास कुटुंबाच्या उत्पादनात निश्चित वाढ होईल’ असे सांगितले होते. करमाळा तालुका कृषी अधिकारी संजय वाकडे यांनी शेतकरी गटांनी स्थानिक पिकावर प्रक्रिया उद्योग करावा, असे आवाहन केले.मंडळ कृषी अधिकारी अनिल चव्हाण यांनी शेतकऱ्यांना बीज प्रक्रियाचे महत्व व शिफारशीप्रमाणे खत व्यवस्थापन कसे करावे याविषयी मार्गदर्शन केले. शेतकरी उत्पादक कंपनी माध्यमातून आपले उत्पादन कसे वाढवावे याविषयी कृषी सहाय्यक गणेश माने यांनी मार्गदर्शन केले. हवामान आधारित फळपीक विमाविषयी गणेश क्षीरसागर यांनी माहिती दिली. रावगावचे सरपंच दादासाहेब जाधव, पंचायत समिती माजी सदस्या स्वाती मुळे, कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य केकान तसेच कृषी विभागाचे कर्मचारी के. वाय. भजनावळे, डी. आर. खाडे, डी. एस. वानखेडे, व्ही. के. सोरटे, दीपक खलसे उपस्थित होते. प्रास्ताविक कृषी सहाय्यक डी. व्ही. नवले यांनी तर आभार प्रगतशील शेतकरी प्रशांत शिंदे यांनी मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा