Breaking

शनिवार, १८ जून, २०२२

तुळजापूर तालुक्यातील तीर्थ (बुद्रुक) येथील महाराष्ट्र विद्यालय चा दहावीचा निकाल शंभर टक्के*



*तुळजापूर तालुक्यातील तीर्थ (बुद्रुक) येथील महाराष्ट्र विद्यालय चा दहावीचा निकाल शंभर टक्के*



प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद.


महाराष्ट्र विद्यालयाचा दहावीचा निकाल 100%.
तिर्थ बु. ता.तुळजापूर. या शाळेचा यावर्षीचा (सन.2022) दहावीचा निकाल शंभर टक्के लागला असुन मागील अनेक वर्षापासून  उज्ज्वल यशाची परंपरा विद्यालयाने अबाधित राखली आहे. महाराष्ट्र विद्यालयातून संजना गुणवंत धर्मसाले या विद्यार्थीनीने 88.20% मार्क मिळवून प्रथम क्रमांक मिळवला. तर साक्षी शाहूराज माने हिने 83.20% मार्क मिळवून द्वितीय क्रमांक मिळवला तर सागर राजेंद्र पासले या विद्यार्थ्याने 82.80% गुण मिळवून तृतिय क्रमांक मिळवला.शाळेच्या यशाचे आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे परिसरातून कौतुक केले जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा