Breaking

रविवार, २८ ऑगस्ट, २०२२

टेंभुर्णी शहराच्या नवीन पाणी वितरण व्यवस्थेसाठी 6 कोटी 42 लाख रु. योजनेचे भूमिपूजन = सरपंच प्रमोद कुटे


टेंभुर्णी शहराच्या  नवीन पाणी वितरण व्यवस्थेसाठी 6 कोटी 42 लाख रु. योजनेचे भूमिपूजन = सरपंच प्रमोद कुटे



टेंभुर्णी प्रतिनिधी

टेंभुर्णी शहर अंतर्गत नवीन पाणी पुरविटयाचे भूमिपूजन रविवार दिनांक 28 /8/ 2022 रोजी सायंकाळी 5 वाजता ओम साईराज मंगल कार्यालय अकलूज चौक टेंभुर्णी या ठिकाणी माढा तालुक्याचे आ बबनरावजी  शिंदे यांच्या शुभहस्ते व करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे तसेच जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजीत शिंदे यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे. जॅकवेल साठी अॅप्रोच ब्रिच, चव्हाणवाडी रोड उंच टाकी, सुरली रोड उंच टाकी, व टेंभुर्णी शहर अंतर्गत पाणीपुरवठा वितरण व्यवस्था एच डी पी ई पाईप द्वारे 33 किलोमीटरची पाईपलाईन इत्यादी कामे मंजूर करण्यात आली आहेत.
       टेंभुर्णी शहराची पूर्वीची पाणी वितरण व्यवस्था खूप वर्षांपूर्वीची जुनी असल्याने टेंभुर्णी शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता टेंभुर्णी शहरा साठी नवीन पाणी वितरण व्यवस्था मंजूर करून घेतली  टेंभुर्णी ग्रामपंचायतीने वेळोवेळी पाणीपुरवठा योजनेविषयी  आमदार बबनदादा शिंदे व आमदार संजय मामा शिंदे यांच्या माध्यमातून पाठपुरावा करून टेंभुर्णी शहरासाठी व परिसरासाठी 33 किलोमीटर अंतराची व दोन पाण्याच्या टाक्या असे 6 कोटी 42 लाख रुपयाची योजना टेंभुर्णी शहरासाठी मंजूर करून घेण्यात आली.
       या योजनेमुळे टेंभुर्णी शहराला सुरळीत पाणीपुरवठा होणार असल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे अशी माहिती सरपंच प्रमोद कुटे यांनी दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा