श्री शारदेय गुरुकुल मध्ये श्लोक पठण स्पर्धा व इतर कार्यक्रमांचे आयोजन
श्री लक्ष्मणराव देशमुख (गुरुजी) बहुउद्देशीय सार्वजनिक संस्था संचलित श्री शारदेय गुरुकुल पब्लिक स्कूल टेंभुर्णी मध्ये शनिवार दिनांक 27 ऑगस्ट 2022 रोजी श्लोक पठण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या आधुनिक प्रगती बरोबर आध्यात्मिक प्रगती साधणे हा या स्पर्धा घेण्या lपाठीमागचा मुख्य हेतू होता.
सध्याची मोबईल पिढी आणि लोप होत चाललेली अध्यात्मिक संस्कृती, यांचं पुनर्जीवन करण्यासाठी प्रशालेने हा एक छोटासा प्रयत्न केला आणि याला भरघोस अशा प्रकारचा प्रतिसाद मिळाला.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेच्या उपाध्यक्षा सौ लता बाळासाहेब देशमुख (काकी) व कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सौ प्रतीक्षा प्रशांत कवडे मॅडम या हजर होत्या तसेच कार्यक्रमाला आणखी एक प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले भक्ती संप्रदायातील व्यक्ती श्री गणेश रामचंद्र कांबळे सर हेही कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते. कार्यक्रमांमध्ये प्रमुख पाहुण्यांच्या सत्कारानंतर विद्यार्थ्यांनी घेतलेल्या विविध श्लोकांचेअर्थपूर्णरित्या वाचन / प्रकटीकरण करण्यात आले . यामध्ये विद्यार्थ्यांनी श्लोकाचे असणारे अर्थ व दैनंदिन जीवनाशी असणारा संबंध जोडून आपापल्या श्लोकांविषयीचे असणारे मत स्पष्ट केले . या स्पर्धा इयत्ता पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आल्या असल्या तरीही पूर्व प्राथमिक गटांच्या विद्यार्थ्यांनी देखील आपल्याला माहिती असलेले श्लोक प्रस्तुत्त करुन सर्वांची माने जिंकली.
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाणी मॅडम यांनी केले. श्री गणेश रामचंद्र कांबळे सर व स्कुलच्या प्रिंसिपल सौ. शाहिदा पठान मॅडम यांनी स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम पाहिले.
याच दिवशी पूर्व प्राथमिक म्हणजे के. जी. विभागा तर्फे "रेड डे " साजरा करण्यात आला, तसेच हाऊस वाईज क्रिकेट मॅच ही घेण्यात आल्या.
सर्व कार्यक्रम अत्यंत शिस्तीत व आनंदाने संपन्न झाले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा