अधिकारी फाउंडेशनच्या मदतीमुळे आज अधिकारी होण्याचं स्वप्न पूर्ण झाल_दतु नायकवाडे
प्रतिनिधी रेडा,इंदापूर
शशिकांत सोनटक्के
एमपीएससी मार्फत टॅक्स असिस्टंट पदासाठी घेण्यात आलेल्या 2021 च्या परीक्षेचा निकाल काल जाहीर झाला यामध्ये NT(D) प्रवर्गात महाराष्ट्रात पहिला येण्याचा मान अधिकारी फाउंडेशनचे लाभर्थी विद्यार्थी दत्तु नायकवाडे यांनी मिळवला दत्तु नायकवाडे हे नाशिक जिल्ह्यातील एका छोट्याश्या गावात शेतकरी कुटुंबात जन्मलेला मुलगा घरात आठरा विश्व दारिद्य्र पण स्वतः काही तरी करुन घराची स्थिती सुधारण्याचे स्वप्न हेच स्वप्न घेऊन पुणे येथे जाऊन एमपीएससीचा अभ्यास करण्याची इच्छा घरच्यांना बोलून दाखवली पुण्यात जायचं म्हणल की खर्च भरपूर आणि तो कुटुंबाला परवडणार नव्हता मग दत्तुने विचार केला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मास्टर पदवी साठी प्रवेश घेउन कमवा आणि शिका या याजनेत काम करायचं ज्यामुळे आपला उदरनिर्वाह होऊ शकेल आणि हाच विचार करुन पुणे ला निघाले दत्तु सरांना पुण्यात आल्यानंतर अधिकारी फाउंडेशनची महिती मिळाली आणि त्यांनी आपली परीस्थिती अधिकारी फाउंडेशनचे अध्यक्ष उस्मान शेख यांना सांगितली अध्यक्षांनी वेळ न घालवता त्यांना अभ्यासिका, पुस्तके आणि मार्गदर्शनची मोफत सोय करुन दिली आणि आज त्याचं फळ दत्तु सरांची टॅक्स असिस्टंट पदी निवड झाली या आनंदी प्रसंगी दत्तु नायकवाडे यांचा पुणे विद्यापीठातील स्पर्धा परीक्षा केंद्रात सत्कार करण्यात आला यावेळी अधिकारी फाउंडेशन अध्यक्ष उस्मान शेख, सचिव महेंद्र शेलार, पुणे विद्यापीठ स्पर्धा परीक्षा केंद्र प्राध्यापक फेजल सर, प्राध्यापक महेद्र दिपके सर उपस्थिति होते शेवटीं दत्तु सरांनी अधिकारी फाउंडेशनचे आभार मानले आणि पुढे असाच अभ्यास करुन उपजिल्हाधिकारी होण्याचं आश्वासन दिले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा