Breaking

बुधवार, १० ऑगस्ट, २०२२

कार्यसम्राट आणि जिजाऊ नगर मित्र मंडळ कुर्डूवाडी संस्थेच्या वतीने मोफत तिरंगा झेंड्याचे वाटप



कार्यसम्राट आणि जिजाऊ नगर मित्र मंडळ कुर्डूवाडी संस्थेच्या वतीने मोफत तिरंगा झेंड्याचे वाटप
कुर्डूवाडी प्रतिनिधी
 स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभक्ती व देशाभिमान जनजागृती करण्याच्या दृष्टीने कार्यसम्राट आणि जिजाऊ नगर मित्र मंडळ कुर्डूवाडी या संस्थेच्या माध्यमातून हरघर तिरंगा अभियानाच्या अंतर्गत मंडळाच्या वतीने मोफत तिरंगा झेंड्याचे वाटप करण्यात आले. नगरसेवक प्रतिनिधी संभाजी सातव यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

मंडळच्या वतिने मोफत तिरंगा झेंडा वाटप या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी नायब तहसीलदार रविकिरण कदम  ,  जितेंद्र कदम ,नगरसेविका सौ वनिता  सातव,
औदुंबर पाटील सर,व इतर मान्यवर हस्ते नागरिकांना तिरंगा झेंडा  वाटपाचा शुभारंभ करण्यात आला .यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शक सूचना दिल्या. उपलब्ध ते नुसार झेंड्याचे वाटप करण्यात आले आहे. यावेळी या भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो: कुर्डूवाडी येथील कार्यसम्राट व जिजाऊ नगर मित्र मंडळ संस्थेच्या वतीने नागरिकांना मोफत तिरंगा झेंड्याचे वाटप करताना मान्यवर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा