Breaking

मंगळवार, ९ ऑगस्ट, २०२२

आज जंतर-मंतरवर आलोय,पुढच्या वेळेस संसदेत घुसेन - रासप अध्यक्ष महादेव जानकर यांनी दिला मोदी सरकारला इशारा


आज जंतर-मंतरवर आलोय,पुढच्या वेळेस संसदेत घुसेन - रासप अध्यक्ष महादेव जानकर यांनी दिला मोदी सरकारला इशारा


करमाळा प्रतिनिधि
राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे या मागणी साठी 5 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री महादेव जानकर यांच्या नेतृत्वाखाली दिल्ली येथे जंतर मंतर मैदानावर एक दिवसीय धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले होते.या प्रसंगी महादेव जानकर यांनी मोदी सरकारला मागणी केली या देशातील सर्वांची जातीनिहाय जनगणना करा. आजपर्यंत काँग्रेसने या मागणीची दखल घेतली नाही,नेहमी विरोध केला त्यामुळे ओबीसी आरक्षण तसेच सर्वच वर्गातील आरक्षणाला धोका निर्माण झाला आहे.
कारण आरक्षण हे लोकसंख्येच्या प्रमाणात दिले जाते परंतु जातीनिहाय जनगणना न झाल्यास आरक्षण अडचणीत आले आहे.त्यामुळे मोदी सरकारने आमची मागणी मान्य करावी ही विनंती करण्यासाठी आज महाराष्ट्रासह देशभरातील कार्यकर्ते घेवून जंतर मंतर मैदानावर आलोय, परंतु जर आमची मागणी मान्य नाही झाली तर भविष्यात या कार्यकर्त्यांना घेवून संसदेत घुसेनं असा इशारा जानकारांनी दिला.
या मागणी मागणी बरोबरच शेतकऱ्यांना मोफत वीज मिळाली पाहिजे,हमी भाव मिळाला पाहिजे,सर्वांना समान शिक्षण मोफत मिळाले पाहिजे,चांगल्या आरोग्याचा सुविधा मिळाल्या पाहिजेत.या आंदोलनाला देशभरातून मोठ्या संख्येने कारयकर्ते स्वखरचीने उपस्थित झाले होते,कार्यक्रमा दरम्यान दिवसभर पाऊस पडत असताना सुद्धा हे आंदोलन अतीशय जोशपूर्न वातावरण पार पडले.
या कार्यक्रमासाठी खासदार श्रीरंग आप्पा बरणे,सदाशिव लोखंडे, धैर्यशील माने,प्रतापराव जाधव, हरिभाऊ राठोड यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला.राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष काशीनाथ नाना शेवते आणि सर्व विभाग अध्यक्ष,जिल्हा अध्यक्ष प्रमुख पदाधिकारी यांनी मनोगत व्यक्त करताना मागण्या मान्य होईपर्यंत मागे हटणार नसल्याचे स्पष्ट केले.
या कार्यक्रमाचे सूत्र संचालन महाराष्ट्र राज्याचे मुख्य महासचिव ज्ञानेश्वर (माऊली) सलगर यांनी केले.
करमाळा तालुक्यातील रासप पदाधिकारी राज शहाजी शेटे-देशमुख करमाळा तालुका अध्यक्ष रासप, विठ्ठल भिसे तालुका उपाध्यक्ष रासप अंगद देवकाते सोलापूर जिल्हा सरचिटणीस रासप,जीवन होगले, प्रवीण होगले,अशोक वाघमोडे (नेते),सुहास ओहळ...यांसह अनेक कार्यकर्ते दिल्ली येथील आंदोलनात सहभागी झाले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा