शिवरत्न नॉलेज सिटीत हर घर तिरंगा कार्यक्रम संपन्न
अकलूज येथील ग्रीनफिंगर्स कॉलेज ऑफ काॅम्प्युटर अँड टेक्नॉलॉजी या महाविद्यालयामध्ये दिनांक 1 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट या कालावधीमध्ये स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त हर घर तिरंगा या मोहिमे अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना व सांस्कृतिक विभाग यांच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. अकलूज शहरातून तिरंगा रॅली, तिरंगा प्रभात फेरी, महविद्यालयामार्फत घरोघरी जाऊन तिरंगा वाटप, तिरंगा जनजागृती, वृक्षारोपन, स्वातंत्र्यावर आधारीत प्रश्नमंजुशा, ध्वजारोहण यासारखे उपक्रम राबविण्यात आले.
दिनांक 15 ऑगस्ट 2022 रोजी शिवपार्वती सार्वजनिक विकास ट्रस्टचे संचालक श्री संजय राखले यांच्या शुभहस्ते ध्वजारोहणाचा प्रमुख कार्यक्रम संपन्न झाला .
याप्रसंगी शिवरत्न इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजचे प्राचार्य डॉ. कुंभार सर, ग्रीन फिंगर्स कॉलेज ऑफ काॅम्प्युटर अँड टेक्नॉलॉजीचे उपप्राचार्य डॉ. महेश ढेंबरे शिवरत्न शिक्षण संस्थेचे प्रशासकीय अधिकारी अश्रफ शेख सर्व पदाधिकारी नॉन टीचिंग स्टाफ उपस्थित होते.
भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातील महिलांचे योगदान हा रथयात्रेचा प्रमुख विषय असून यामध्ये संस्थेमधील महिला कर्मचारी यांनी सहभाग घेतला .
तिरंगा आपल्या देशाचा अभिमान व सन्मान आहे आपला राष्ट्रध्वज आपल्यासाठी धैर्याचे व प्रेरणेचे प्रतीक आहे .
तिरंगा हा आपल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाची आठवण करून देतो आपल्या ध्वजाचा अधिक सन्मान करण्यासाठी *आजादी का अमृत महोत्सव* *अंतर्गत हर घर तिरंगा ही मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत शिवरत्न नॉलेज सिटी व ग्रीनफिंगर्स कॉलेज ऑफ काॅम्प्युटर अँड टेक्नॉलॉजीमधील विद्यार्थी यांनी उत्साह पूर्ण सहभाग नोंदवला .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा