Breaking

शनिवार, २७ ऑगस्ट, २०२२

गणेशोत्सवात डीजे वापरू नका ःसामाजिक सलोखा राखा .. पो. नि. सुरेश निंबाळकर



गणेशोत्सवात डीजे वापरू नका ः
सामाजिक सलोखा राखा ..... पो. नि. सुरेश निंबाळकर


 
 

बेंबळे ।प्रतिनिधी।           

            येत्या गणेशोत्सवामध्ये गणेश मंडळांनी गणरायाचे आगमन व विसर्जन मीरवणुकीत  तसेच स्टेजभोवतीदेखील डीजे चा वापर करू नये, उत्सवापूर्वी अधिकृत परवानगी घ्यावी, गणेशा पुढे देखावा सादर करताना कोणत्याही प्रकारे सामाजिक भावना दुखावल्या जाणार नाहीत याची कसोशीने काळजी घ्यावी व सामाजिक सलोखा राखण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करावा व शांततेत आणि आनंदाने गणेशोत्सव साजरा करावा व सर्वांना सहकार्य करावे  असे आव्हान टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी  बेंबळे येथे बोलताना केले आहे. बेंबळे हे मोठ्या लोकसंख्येचे व टेंभुर्णी बीट मधील प्रमुख मोठे गाव असल्यामुळे या ठिकाणी गणेश उत्सवादरम्यान उत्सव मंडळांनी कोणती काळजी घ्यावी याबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी पोलीस निरीक्षक निंबाळकर यांनी बैठकीचे आयोजन केले होते याप्रसंगी त्यांनी सर्वांना मार्गदर्शन केले.
        या कार्यक्रमास सरपंच विजय पवार बेंबळे सोसायटीचे चेअरमन सदाशिव भोसले सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील भोसले पोलीस पाटील बिभीषण कीर्ते  बीट कॉन्स्टेबल तुकाराम माने- देशमुख सी.ओ. गुटाळ ग्रामपंचायत सदस्य भारत कोळी आबा काळे सागर भोसले यश भोसले सोमनाथ कोळी दादा कोळी तात्या शिंदे बाळू मदडे आदी मान्यवर उपस्थित होते. बैठकीचे प्रास्ताविक सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन पोलीस पाटील बिभीषण कीर्ते यांनी केले .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा