कविटगाव येथील सरपंच शिवाजी सरडे यांचे चिरंजीव पैलवान यश सरडे याला राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक, करमाळा तालुक्यामधून होत आहे पैलवान यश सरडे याचे कौतुक
करमाळा प्रतिनिधी अलिम शेख मो ९८५०६८६३६०
रोहतक (हरियाणा) येथे झालेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत १५ वर्षाखालील 44 किलो वजन गटात राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत पै यश शिवाजी सरडे याने गोल्ड मेडल पटकावले त्याला पै. अमोल बुचडे कुस्ती संकुल पुणे येथे रुस्तम हिंद पैलवान अमोल बुचडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे येथे पै.यश शिवाजी सरडे सराव करत आहे.
यामध्ये कविटगावचे सरपंच पै. शिवाजी (काका)सरडे यांचा पै.यश सरडे हा मुलगा आहे.
त्याला वडिलांची पाठबळ मिळाले पै.यश शिवाजी सरडे राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक मिळल्याबद्दल माजी आमदार पै. नारायण (आबा )पाटील, मुंबई महापौर केसरी पै. विजय (दादा) गुटाळ, चिकलठाणचे सरपंच चंदूकाका सरडे, डबल उपमहाराष्ट्र केसरी पै. अतुल (भाऊ) पाटील, महाराष्ट्र केसरी पै.चंद्रहास (बापू )निमगिरे व संपूर्ण महाराष्ट्रातून त्याचे कौतुक होत आहे करमाळा तालुक्यातील कविटगाव येथील पैलवान यश सरडे असून ग्रामीण भागातील त्याने पहिल्यांदाच राष्ट्रीय पातळीवरील कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक मिळवल्याने त्याचे विशेषता जेऊर सह परिसरातून विशेष कौतुक होत आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा