Breaking

सोमवार, १२ सप्टेंबर, २०२२

टेंभुर्णी येथे ब्रह्मकुमारी संस्थेतर्फे 75 ज्येष्ठांचा अमृत महोत्सवी वाढदिवस साजरा होणार...



टेंभुर्णी येथे ब्रह्मकुमारी संस्थेतर्फे 75 ज्येष्ठांचा अमृत महोत्सवी वाढदिवस साजरा होणार...



 बेंबळे। प्रतिनिधी

भारत देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून प्रजापिता ब्रह्माकुमारी अध्यात्मिक संस्था टेंभुर्णी कार्यालयाचे वतीने मंगळवार दिनांक 13 सप्टेंबर रोजी सकाळी 75 वर्षे वयाच्या ज्येष्ठ 75 नागरिकांचा अमृत महोत्सवी वाढदिवस साजरा करण्याचा कार्यक्रम टेंभुर्णी येथील संकेत मंगल कार्यालयामध्ये आयोजित केला आहे. 



कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार बबनदादा शिंदे हे असून माउंट आबू मुख्यालयातील राजयोगी डॉक्टर बनारसभाई हे उद्घाटक तर पुणे विभागाचे प्रमुख राजयोगी दशरथभाई हे मुख्य मार्गदर्शकवक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत. या प्रसंगी ब्रह्माकुमारी सोलापूर झोनच्या प्रमुख राजयोगिनी सोमप्रभादिदी व टेंभुर्णी येथील डॉक्टर ए एस पावले यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास उदगीर लातूर पुणे भूम बार्शी येथील ब्रह्माकुमारी अध्यात्मिक दैवी परिवारातील मान्यवर व तसेच टेंभुर्णी व परिसरातील अनेक मान्यवर नागरिक उपस्थित राहणार आहेत. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन टेंभुर्णी केंद्राच्या प्रमुख संचालिका अनिताबेहेनजी व येथील हेमा पावले यांनी केले आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा