*महात्मा फुले विद्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती उत्साहात साजरी*
वरवडे ता. माढा - येथील रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले विद्यालयात रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांची 135 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य माननीय अॅड. बाळासाहेब पाटील, स्कूल कमिटी सदस्य विष्णुपंत गायकवाड तसेच भाऊसाहेब गायकवाड, विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय चव्हाण पी एन तसेच बहुसंख्य पालक व ग्रामस्थ उपस्थित यांच्या हस्ते कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेची वरवडे गावांमधून ट्रॅक्टर मधून भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, झाशीची राणी लक्ष्मीबाई, अहिल्यादेवी होळकर तसेच थोर संत तुकाराम महाराज आदी
महापुरुषांच्या वेशभूषेत विद्यार्थी सहभागी झाले होते. तसेच तालबद्ध लेझीम व झांज पथकाने सर्व ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेतले.

कमवा आणि शिका या योजनेतून कर्मवीर अण्णांनी विद्यार्थ्यांना श्रमाची प्रतिष्ठा मिळवून दिली .गोरगरीब विद्यार्थी स्वतः कमवून शिकू लागला . त्यामुळेच 22 सप्टेंबर हा दिवस श्रमप्रतिष्ठा दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
लेझीम व झांज पथकासाठी उपशिक्षक श्री म्हेत्रे डी एम , श्री मुंजाळ एस एम तसेच श्री लक्ष्मण कांबळे यांचे विशेष सहकार्य लाभले . यावेळी सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा