Breaking

मंगळवार, १ नोव्हेंबर, २०२२

सावरगाव जिल्हा परिषद प्रशालेतील विद्यार्थ्यांचा उपक्रम 1990 च्या बॅचचे स्नेह मेळावा उत्साहात...तब्बल 32 वर्षानंतर भेटले वर्ग मित्र आणि गुरुजन....



सावरगाव जिल्हा परिषद प्रशालेतील विद्यार्थ्यांचा उपक्रम 1990 च्या बॅचचे स्नेह मेळावा उत्साहात...
तब्बल 32 वर्षानंतर भेटले वर्ग मित्र आणि गुरुजन....



सावरगाव प्रतिनिधी
तुळजापूर तालुक्यातील सावरगाव जिल्हा परिषद प्रशालेतील 1989-90 च्या दहावी वर्गातील विद्यार्थी विद्यार्थिनींचा व गुरुजनांचा स्नेह मेळावा येथील पार्षवनाथ जैन सांस्कृतिक कार्यालयात उत्साहात पार पडला या सोहळ्यात 1989-90 दहावी वर्गात शिकत असलेल्या 42 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला तर तत्कालीन बारा शिक्षक आणि  शिक्षिका जे आता सेवानिवृत्त झाले आहेत त्यांची उपस्थिती उल्लेखनीय होती, गेल्या वर्षभरापासून या ऐतिहासिक स्नेह मेळावा सोहळ्याची जय्यत तयारी सुरू होती. व्यवसाय नोकरी निमित्त बाहेर वास्तव्यास असलेल्या 42 विद्यार्थ्यांनी या सोहळ्यात सहभाग नोंदवला यावेळी तत्कालीन गुरुजनांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली त्यानंतर सर्व गुरुजनांचा शाल, आदर्श शिक्षक जिवन गौरव पुरस्कार स्मृतीचिन्ह देऊन येतोचित सन्मान करण्यात आला.  खरा तो एकची धर्म ही प्रार्थना सामूहिक रित्या म्हणून घेण्यात आली, दिवसभर चाललेले असा हा मेळावा कार्यक्रमात मित्रपरिचय अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या विद्यालयाने आठवणींना उजाळा देत तब्बल 32 वर्षानंतर भरलेल्या आणि या वर्गाचा आनंद घेतला याप्रसंगी, मुला मुलीनी आपले मनोगत व्यक्त केले.  प्रमुख पाहुणे म्हणून परिवर्तन सामाजिक संस्थेचे संस्थापक मारुती बनसोडे यांच्यासह गुरुजन उपस्थित. या सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सौं. वर्षा संभाजी पवार केले.
या स्नेह मेळावा अंतर्गत असलेल्या 9 मुलीं अनिता बोबडे, सुवर्णा घडमोडे, वैशाली भोसले, रत्नमाला पाटील, माधुरी गलांडे, विजया सुतार, ललिता तानवडे, शिल्पा सावगावकर, विजयमाला जाधवर यांना सर्व मुलांच्या वतीने दिवाळी भाऊबीज म्हणून साडी व पाहुण्याना टॉवेल टोपी देऊन साजरी केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा