Breaking

गुरुवार, २४ नोव्हेंबर, २०२२

टेंभूर्णीच्या रोहिदास वाघमारे यांची महाराष्ट्र शुटींग व्हॉलीबॉल संघात निवड


टेंभूर्णीच्या रोहिदास वाघमारे यांची महाराष्ट्र शुटींग व्हॉलीबॉल संघात निवड


टेंभूर्णी/ धनंजय भोसले यांस कडून 

टेंभूर्णी ता.माढा येथील व्हॉलीबॉल पट्टू रोहिदास वाघमारे यांने पातुर जिल्हा अकोला येथे झालेल्या स्पर्धेत राज्य निवड चाचणी मध्ये उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केल्याने त्यांची  महाराष्ट्र राज्य  शूटिंग हॉलीबॉल संघात नुकतीच निवड झाली असून दिनांक 25 26 आणि 27 डिसेंबर रोजी जयपुर राजस्थान येथे भारतीय शूटिंग हॉलीबॉल संघासाठी निवड चाचणी स्पर्धा होणार आहेत त्या स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघातून खेळण्याची संधी रोहिदास वाघमारे यांस मिळणार असून या निवडीबद्दल टेंभूर्णीचे सरपंच प्रमोद कुटे, मातंग एकता आंदोलन चे वतीने रामभाऊ वाघमारे, यशवंत शुटींग व्हॉलीबॉल संघ ॲडव्होकेट संतोष कानाडे,यांचे वतीने व्हॉलीबॉल पट्टू रोहिदास वाघमारे यांचा सत्कार करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी प्रकाश पवार, रणजित देशमुख,अप्पा आरडे, सोमनाथ नलवडे, टेंभूर्णीतील खेळाडू अप्पा कसबे नाना चौगुले,रोहित आरडे, आल्प संख्यांक कमीटीचे जिल्हा उपाध्यक्ष राजू तांबोळी पत्रकार संतोष वाघमारे,बाळू चव्हाण,शानु आतार, अजित इंगळे,संजय होदाडे सुमीत आरडे आदिजण उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा