Breaking

गुरुवार, २४ नोव्हेंबर, २०२२

विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्यामार्फत २० नोव्हेंबर अखेरपर्यंत ऊस बिल शेतक-यांच्या बँक खात्यात जमा- आमदार बबनराव शिंदे.



विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्यामार्फत २० नोव्हेंबर अखेरपर्यंत ऊस  बिल शेतक-यांच्या बँक खात्यात जमा-  आमदार बबनराव शिंदे.


कन्हेरगांव दि प्रतिनिधी ( धनंजय मोरे )

 विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे युनिट नं.1 पिंपळनेर व युनिट नं.2 करकंब येथील सन 2022-23 चा गाळप हंगाम सुरू असून या गळीत हंगामात गाळपास आलेल्या तिस-या  दहा दिवसाचे प्रति टन 2350 रूपये प्रमाणे पहिला ॲडव्हान्स हप्ता बील सभासद व ऊस पुरवठादार शेतक-यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आला असल्याची माहीती कारखान्याचे संस्थापक चेअरमन आ.बबनराव शिंदे  यांनी दिली.
      अधिक माहीती देताना आ.बबनराव शिंदे म्हणाले, विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे युनिट नं.1 पिंपळनेर व युनिट नं.2 करकंब या कारखान्याचा सन 2022-23 चा गाळप हंगाम जोमाने सुरू आहे. युनिट नं.1 पिंपळनेर येथे आजअखेर 4 लाख 09 हजार 683 मे.टन व युनिट नं.2 करकंब येथे  आजअखेर 1 लाख 23 हजार 440 मे.टन ऊसाचे गाळप झालेले आहे. या गळीत हंगामात दोन्ही युनिटकडे दि.11/11/2022 ते 20/11/2022 या तिस-या 10 दिवसाचे कालावधीत गाळपास आलेल्या ऊसास प्रति टन रू.2350/-प्रमाणे पहिला ॲडव्हान्स हप्ता ऊस पुरवठादार शेतक-यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आला आहे. त्यासाठी कारखान्याने 34 कोटी 18 लाख रूपये ऊस पुरवठादारांचे बँक खात्यावर वर्ग केले आहेत.
        सदरप्रसंगी कारखान्याचे व्हाईस चेअरमन वामनराव उबाळे, कार्यकारी संचालक एस.एन.डिग्रजे व इतर अधिकार उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा