प्राजक्ता चंदनकरने एकाच आठवड्यात लोकसेवा आयोगाच्या दोन पोस्ट काढल्या
कक्ष अधिकारी व विक्रिकर निरीक्षक या दोन परीक्षा पास
भिमानगर/ प्रतिनिधी
प्रदीपराव पाटील
माढा तालुक्यातील आलेगाव बुद्रुक हे तसे दुर्लक्षित गाव बागायती गाव असल्याने ऊसाचे भरघोस उत्पन्न मुळे शेतकरी सधन यामुळे शिक्षणाकडे गांभीर्याने कोण पहात नसत परंतू याच गावात शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या कु.प्राजक्ता परमेश्वर चंदनकर या मुलीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात कक्ष अधिकारी ही परीक्षा उत्तीर्ण होऊन गावात एका शेतकऱ्याच्या मुलीने कोणत्याही क्लासविना यश संपादन केले यामुळे सगळीकडे तिचा सन्मान होत असताना बुधवारी पुन्हा लोकसेवा आयोगाच्या विक्रिकर निरीक्षक या पदांसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेतही बाजी मारली एकाच आठवड्यात लोकसेवा आयोगाच्या दोन पोस्ट मिळवणारी प्राजक्ता ही माढा तालुक्यातील पहीलीच अधिकारी असावी.
कु.प्राजक्ता परमेश्वर चंदनकर हिचे प्राथमिक शिक्षण जि.प. प्राथमिक शाळा आलेगाव बुद्रुक व माध्यमिक शिक्षण भैरवनाथ विद्यालय आलेगाव बुद्रुक येथे झाले दहावी मध्ये ९३ टक्के व अकरावी बारावी सदाशिवराव माने विद्यालय अकलूज या ठिकाणी झाले असून बारावी मध्ये 84 टक्के मार्क उत्तीर्ण होऊन बीएससी फिजिक्स विषयातून टीसी कॉलेज बारामती इथून पदवी पूर्ण केली पुणे विद्यापीठाकडून सर्व विषयात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याने गोल्ड मेडल प्राप्त करून एम एस सी फिजिक्स पुणे विद्यापीठ 2019 पूर्ण केले तसेच प्राजक्ता चंदनकर हिने सहाय्यक प्राध्यापक म्हणजेच सेट परीक्षा 2020 ला उत्तीर्ण होऊन कोणत्याही क्लास विना प्राजक्ता चंदनकर पहिल्याच प्रयत्नात अनेक यशाची शिखरे सर करत गेली हे यश संपादन केले आहे.
आईचे नाव सुनिता व वडिलांचे परमेश्वर या दोघांचेही सातवीपर्यंत शिक्षण झाले असून प्राजक्ता चंदनकर ही समाजात आयडॉल झाली आहे. प्राजक्ता ही घरी असताना आई-वडिलांच्या कामात हातभार लावत असे शेतकरी कुटुंब असल्याने घरी गाईं म्हशीचा मोठा तबेला असल्याने गायींना वैरण करणे, झाडलोट करणे, आई स कामात मदत करणे अशा सर्व गुणसंपन्न प्राजक्ताने फुलांच्या नावाप्रमाणे कुटुंबात व समाजात सुगंध दरवळला आहे.
कु.प्राजक्ता परमेश्वर चंदनकरने दोन लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मिळवलेल्या अद्वितीय यशाने तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा