Breaking

सोमवार, ५ डिसेंबर, २०२२

रासपची किनवट तालुका कार्यकारिणी जाहीर


रासपची किनवट तालुका कार्यकारिणी जाहीर


नांदेड जिल्हा प्रतिनिधी
बालाजी सिरसाट

किनवट : राष्ट्रीय समाज पक्षाची तालुका कार्यकारिणी बैठक दि.४-डिसेंबर रोजी गोकुंदा किनवट येथे जिल्हाध्यक्ष प्रा.शिवाजीराव इंदुरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

प्रा.शिवाजीराव इंदुरे यांनी उपस्थितांना आपल्या न्हाय हक्काची जाणीव निर्माण करून देताना संघटनेचे महत्त्व पटवून दिले. जिल्हाध्यक्षांनी तालुका नूतन कार्यकारिणीची निवड केली.त्यात रासप तालुका अध्यक्षपदी बाबुराम तुळशीराम भिंगे तर उपाध्यक्षपदी जनार्दन दादाराव कवडे, तालुका सचिवपदी प्रा.सदाशिव इंदुरे तर तालुका युवा अध्यक्षपदी हानमंत नारायण गडदे यांची निवड करण्यात आली.

यावेळी रासपचे राष्ट्रीय संघटक प्रा. गोविंदराव सुरनर,बालाजी बामणे,बळिराम अकोले ,शिवाजी बोरकर, गोविंदराव नरोटे, सुधाकर नरोटे ,दिसंबर सलकम वाड,  नवनाथ मुंडकर, माधव जबडे, मारुती केंद्रे, बैजनाथ आमनवाड आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा.सदाशिव इंदुरे तर सूत्रसंचलन प्रा.बालाजी मुडे यांनी केले शेवटीं रमेश मुंडकर यांनी सर्वांचें आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा