राज्यातील कोतवालांना सरसकट पंधरा हजार रुपये वेतन लागू करा....
कोतवाल संघटनेचे महसूल मंत्र्यांना निवेदन..
बेंबळे। प्रतिनिधी।
महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेच्या वतीने विविध मागण्यासाठी नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनासमोर आंदोलन करण्यात आले, यावेळी राज्यातील सर्व विभागातील कोतवाल मोठ्या संख्येने उपस्थित होते .आपल्या निवेदनात कोतवाल संघटनेने म्हटले आहे की सरसकट 15000 रुपये वेतन वाढ लागू करण्यात यावी ही वाढ कोतवालाना चतुर्थ श्रेणी मिळेपर्यंत देण्यात यावी या व इतर मागण्यांचे निवेदन राज्याचे महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना देण्यात आले .यावेळी सोलापूर जिल्हा अध्यक्ष विठ्ठल गुरव म्हणाले की कोतवाल कर्मचाऱ्यांना चतुर्थ श्रेणी दर्जा देण्यात यावा .महाराष्ट्र राज्यातील सर्व कोतवाल कर्मचारी यांना समान काम वेतन या धर्तीवर वेतन लागू करावे तसेच तलाठी व महसूल सहाय्यकामध्ये ग्रामपंचायत कर्मचारी धरतीवर पंचवीस टक्के तलाठी आरक्षण लागू करावे, मृत कोतवाल कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्त्वावर सेवेत सामावून घ्यावे, सेवानिवृत्त कोतवालांना निर्वाह भत्ता देण्यात यावा, कोतवाल निवृत्तीचे वय हे 65 वर्ष करावे इत्यादी विविध मागण्या निवेदनात नमूद केलेल्या होत्या.
महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटना राज्य अध्यक्ष शिवप्रसाद देवणे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला होता, यामध्ये पाच ते सहा हजार कोतवाल सामील झाले होते अशी माहिती संघटनेचे सचिव कृष्णा शिंदे यांनी दिली. आंदोलन स्थळावर आमदार मंगेश चव्हाण आमदार बबनदादा शिंदे आमदार रणजीत सिंह मोहिते पाटील आमदार बबनराव लोणीकर आमदार विनय कोरे आमदार गोपीचंद पडळकर आदी आमदारांनी या मागण्यांचा पाठपुरावा करणार असल्याचे स्पष्ट सांगितले. आपण तारांकित प्रश्न मांडू व लक्षवेधी देखील करू असे आ. गोपीनाथ पडळकर व आमदार बबन दादा शिंदे यांनी सांगितले.
मुंबई मंत्रालयात मिटींग होणार....
नागपूर अधिवेशन संपल्यानंतर महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह मुंबई येथे अप्पर मुख्य सचिव व महसूल सहसचिव यांच्यासोबत बैठक घेऊन कोतवालांच्या सर्व मागण्यावर विचारविनिमय करून त्या मान्य देखील करण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी याप्रसंगी
पदाधिकाऱ्यांना दिले , याप्रसंगी कोतवाल शिष्टमंडळासोबत आमदार मंगेश चव्हाण चाळीसगाव हे देखील उपस्थित होते.
चौकट.....
आमदार बबनदादा शिंदे यांनी घेतली विशेष दखल...
याप्रसंगी आमदार बबनदादा शिंदे यांनी सोलापूर जिल्ह्यातील कोतवालांची आवर्जून भेट घेऊन त्यांना आपण कोतवालांच्या मागण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व महसूल मंत्री व आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन निश्चित प्रयत्न करू असे आश्वासन दिले, याप्रसंगी सोलापूर जिल्हा अध्यक्ष विठ्ठल गुरव तसेच शहाजी हुलगे सुदर्शन गुरव व इतर जिल्हा पातळीवरील पदाधिकारी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा