Breaking

गुरुवार, १५ डिसेंबर, २०२२

विवाहित महिलेवर अत्याचारमहाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल



विवाहित महिलेवर अत्याचार
महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल





महाड – प्रतिनिधी 
महाड तालुक्यातील कोथेरी गावातील एका विवाहित महिलेवर बलात्कार करत तिचा मोबाईल मध्ये फोटो आणि व्हिडीओ क्लीप काढत सदर फोटो आणि व्हिडीओ क्लीप व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार अत्यचार करणाऱ्या तीन आरोपींच्या विरोधात महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी पिडीत महिलेचा पती आजारी असल्याने काचले येथील काशिनाथ कृष्णा पवार आणि आशा काशिनाथ पवार यांनी पतीवर कोणीतरी करणी केल्याचे सांगितले. त्यानंतर त्याच्या अंगावरून तांदूळ काढून फेकून देत तेथून ते निघून गेले मात्र त्यानंतर आरोपी काशिनाथ हा पुन्हा पिडीत महिलेच्या घरी आला आणि कागदाच्या पुडीत आणलेली पावडर आजारी पतीला पाण्यातून दिली. यामुळे पिडीतेच्या पतीला गुंगी आली. आरोपी काशिनाथ याने यावेळी पिडीतेच्या इच्छेविरोधात बळजबरीने अत्याचार केला. आरोपी याने या पिडीत महिलेचे व्हिडिओ क्लीप आणि फोटो काढत व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार अत्याचार केला आणि तिच्याकडून सुमारे १२,००,००० रुपये धमकी देऊन घेतले. सदर घटना मे २०१६ ते सप्टेंबर २०२१ या दरम्यान घडली आहे.
याप्रकरणी सदर पिडीत महिलेने काशिनाथ कृष्णा पवार, आशा काशिनाथ पवार, अभी काशिनाथ पवार सर्व राहणार काचले महाड सद्या राहणार चेंबूर मुंबई, यांच्या विरोधात भाद्वी कलम ३७६(न),३८४,३८५, ३२८,५०६,३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस सब इन्स्पेक्टर पांडुरंग कापडेकर हे करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा