तांबवे ग्रामस्थांच्यावतीने विविध क्षेत्रातील मान्यवरांना आदर्श पुरस्कार प्रदान.
धनंजय मोरे यांना आदर्श पत्रकार पुरस्कार.
कन्हेरगांव दि प्रतिनिधी
तांबवे टें तालुका माढा येथील ग्रामस्थांच्या वतीने विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना आदर्श पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले . यावेळी कन्हेरगांव येथील पत्रकार धनंजय मोरे यांना आदर्श पत्रकार पुरस्कार देऊन तांबवे गावचे तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष नागाभाऊ खटके पाटील व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष नागेश खटके पाटील यांच्या उपस्थितीत आदर्श पत्रकार म्हणून गौरविण्यात आले.
तांबवे टें तालुका माढा येथे गुरुवारी १५ डिसेंबर रोजी सकाळी अखंड हरिनाम सप्ताहात विविध क्षेत्रातील मान्यवरांना आदर्श पुरस्काराचे वाटप करण्यात आले.
यावेळी आदर्श कुटुंब - गोविंद गोडसे, आदर्श आई वडील - दगडु खटके,शांताबाई खटके ,
आदर्श शेतकरी शरद खटके ,
आदर्श सासूबाई - सुवर्णा
उधव खटके , आदर्श सूनबाई राणी संतोष कोल्हे ,आदर्श समाजसेवक विशंवभर गोडसे,
आदर्श खेळाडू कुमारी पै. विपुली विकास खटके या सर्वांना सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले .
यावेळी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष नागाभाऊ खटके, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष नागेश खटके,भजनदास खटके,अशोक खटके,संतोष खटके, व्यसनमुक्त समितीचे अध्यक्ष विजय खटके, सुधाकर खटके ,महारुद्र खटके,अक्रूरुर खटके,सचिन कांबळे, भैरवनाथ शुगर कारखान्याचे अधिकारी विजय खटके ,हणमंत ढवळे,रामभाऊ पाटील,बापू पाटील गणेश पाटील बाळासाहेब खटके, विश्वंभर गोडसे, नागा गोडसे,दत्ता गोडसे,रामभाऊ गोडसे, शिवलाल थोरात ,रमेश थोरात,तात्या देशमुख,आप्पा करंडे,बाळू कोल्हे,बाबुराव भोसले,मंगेश खटके,सचिन तळेकर,सागर खटके, भारत खटके , काशिनाथ माने आदी उपस्थित होते.
सूत्रसंचालन भैरवनाथ शुगर साखर कारखान्याचे अधिकारी विजय खटके यांनी केले तर आभार नागेश खटके यांनी मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा