Breaking

बुधवार, २१ डिसेंबर, २०२२

कोरोनाचे निर्बंध पुन्हा येण्याची शक्यता मास्क वापरणे बंधनकारक होणार?



कोरोनाचे निर्बंध पुन्हा येण्याची शक्यता मास्क वापरणे बंधनकारक होणार ?


मुंबई (मिलिंद माने) कोरोना संपला अशी परिस्थिती निर्माण होत असताना. आता पुन्हा एकदा कोरोना ने डोकं वर काढले आहे या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लक्ष ठेवण्यासाठी टास्क फोर्स नेमण्यात येणार असल्याचे सांगितले
कोरोनाच्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी टास्क फोर्स नेमण्यात येण्याबाबत तसेच मास्क वापरण्या बाबत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी सूचक विधान केले आहे
कोरोना बाबतचा नेमण्यात येणारा टास्क फोर्स हा राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीवर बारकाईने नजर ठेवणार आहे व त्याबाबत राज्य सरकारला वेळोवेळी सूचना करणार आहे चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाची आकडेवारी मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने केंद्र सरकारकडून सर्व राज्यांना पत्र पाठवून अलर्ट राहण्याबाबत सूचना दिल्या आहेत
 कोरोना बाधितांच्या. आकडेवारीवर राज्य राज्य सरकार जरी लक्ष ठेवून असले तरी शाळा कॉलेज व प्रवासादरम्यान मास्क वापरणे बंधनकारक करण्याची शक्यता वर्तवली जात आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा