Breaking

मंगळवार, २० डिसेंबर, २०२२

टेंभुर्णी येथे राष्ट्रसंत गाडगे महाराज मंदिरासमोरील सभामंडपाचे लोकार्पण*


*टेंभुर्णी येथे राष्ट्रसंत गाडगे महाराज मंदिरासमोरील सभामंडपाचे लोकार्पण* 


आज २० डिसेंबर रोजी राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या ६६ व्या पुण्यतिथी दिनी माढा तालुक्याचे आ. बबनराव शिंदे यांच्या आमदार फंडातून मौजे लोंढेवस्ती टेंभुर्णी येथे राष्ट्रसंत गाडगे महाराज मंदिरासमोर बांधलेल्या सभामंडपाचा  लोकार्पण सोहळा जिल्हा दुध संघाचे चेअरमन रणजित शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी टेंभुर्णीचे सरपंच प्रमोद कुटे, भाजपचे माढा तालुकाध्यक्ष योगेश बोबडे, मा. पं.स.सदस्य वैभव कुटे, माढा तालुका शिवसेनाप्रमुख मधूकर देशमुख, कृ.उ.बाजार समितीचे संचालक अनंता कुटे, युवा उद्योजक सूरज देशमुख, गोरख देशमुख, युवा नेते ऋषिकेश बोबडे, ग्रा. पं. सदस्य भाऊसाहेब महाडीक, गणेश केचे, शैलेश ओहोळ, आर.पी.आय.चे नेते जयवंत पोळ, बाळासाहेब ढगे, विलास देशमुख, ॲड. मंगेश देशमुख, हरिप्रसाद यादव, वैभव महाडीक, सुरेश कुटे, राजेश बागवाले, वाघावकर गुरुजी, प्रशांत देशमुख आदी उपस्थित होते. यावेळी मंदिरासाठी विनामोबदला जागा दान देणाऱ्या गोरख बापू लोंढे यांचा रणजित शिंदे यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.
प्रारंभी गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रसिद्ध कीर्तनकार भोसले महाराज कंदरकर यांचे कीर्तन संपन्न झाले यानंतर पुष्पवृष्टी करण्यात आली. 
          परीट समाजाच्या अडचणी सोडवण्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्न करु असे रणजित शिंदे यांनी  उपस्थितांना आश्र्वस्थ केले.
कार्यक्रमास टेंभुर्णी व परिसरातील सर्व समाज बांधव व मोठ्या संख्येने नागरिक, माता भगिनी उपस्थित होत्या.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समाजातील सर्व समाज बांधवांनी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा