नोबेल इंग्लिश स्कूल करमाळा च्या राजलक्ष्मी दत्तात्रय सुतार ज़िल्हा योगासन स्पर्धेत प्रथम क्रमांक.
करमाळा प्रतिनिधी
दिनांक 12-12-22 रोजी रोजी ज़िल्हा क्रीडा संकुल सोलापूर येथे संपन्न झालेल्या शालेय ज़िल्हा योगासन स्पर्धेत सोलापूर ज़िल्हातुन विविध शाळातील 200 योगासन खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. नोबेल इंग्लिश मेडीयम स्कूल करमाळा च्या खेळाडूने चौदा वर्षाखालील मुलींच्या ट्रॅडीशनल योगासन प्रकारात कु राजलक्ष्मी दत्तात्रय सुतार हिने प्रथम क्रमांक मिळवून घवघवीत यश संपादन केले.ती गेली 2 वर्षे झाली योगासनाचा सराव करत आहे.तिच्या या यशामागे मुख्याध्यापीका एलीझाबेथ असादे मॅडम तसेंच त्रिमूर्ती स्पोर्ट्स क्लब करमाळाचे योगा प्रक्षिशक सागर शिरस्कर सर ,सानिका भगत मॅडम ,अजय बालशंकर सर यांचे विशेष सहकार्य लाभले.तरी करमाळा शहरातुन सर्व स्तरातून राजलक्ष्मी दत्तात्रय सुतार हिचे कौतुक होतं आहे.राजलक्ष्मी सुतार हिचे वडील करमाळा पंचायत समिती बांधकाम विभागात आहेत.या स्पर्धेतून आगामी नगर येथे होणाऱ्या विभागीय योगासन स्पर्धेसाठी सोलापूर चा योगासनाच्या संघाची निवड करण्यात आली.स्पर्धेचे उदघाटन ज़िल्हा क्रीडा अधिकारी नितीनजी तारळकर यांच्या हस्ते झाले.स्पर्धेसाठी सोलापूर ज़िल्हा योग परिषदेच्या अध्यक्षा स्नेहल पेंडसे व अधिकृत पंच यांनी सहाय्य केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा