वंचित बहुजन युवा जिल्हा आघाडी च्या वतीने राज्यपाल कोषारी तसेच भाजपा आमदार प्रसाद लाड व केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा केला एका पत्रकाद्वारे निषेध व्यक्त
करमाळा प्रतिनिधी
वंचित बहुजन युवा जिल्हा आघाडी च्या वतीने राज्यपाल भाजपा आमदार तसेच केंद्रीय राज्यमंत्री यांचा एका पत्रका द्वारे निषेध केला असल्याची माहिती आघाडीचे जिल्हाध्यक्ष साहेबराव वाघमारे यांनी दिली आहे
निषेध पत्रकात पुढे असे म्हटले आहे की
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलताना खासदार, आमदार, मंत्री व राज्यपाल वारंवार अपमानास्पद बोलत असतात, छत्रपती शिवाजी महाराज हे या देशाचे दैवत असून त्यांच्याबद्दल बोलत असताना मंत्रिमंडळातील आमदार, मंत्री तसेच या राज्याचे राज्यपाल यांनी भान ठेऊन बोलणे आवश्यक आहे. असे निषेध पत्रकात म्हटले आहे
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द, एकेरी तसेच अन्य प्रकारे वक्तव्य करुन सतत तमाम शिवप्रेमींच्या भावना दु:खवत असतात, त्यामुळे शिवप्रेमींच्या भावना भडकवण्याचे काम हे करत असतात.
देशातील कोणत्याही महापुरुषांबद्दल अपशब्द, एकेरी पणाचे बोलणे तसेच इतर प्रकारे त्यांच्यावर भाष्य करणे हे महाराष्ट्र तसेच देशातील शांततेचा भंग होण्यास कारणीभूत ठरु शकते. याबाबत वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष साहेबराव वाघमारे यांनी मा.मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य,मा.राज्यपाल भगतसिंग कोश्यारी महाराष्ट्र राज्य, केंद्रिय राज्यमंत्री मा.रावसाहेब दानवे तसेच मा.प्रसाद लाड, आमदार भाजपा यांना पत्रे पाठविलेली आहेत व मा.मुख्यमंत्री साो, महाराष्ट्र राज्य यांना याबाबत कारवाई करण्याचे आवाहन वंचित बहुजन युवा आघाडी सोलापूर जिल्ह्याच्या वतीने पत्राद्वारे केले आहे
.
चौकट घेणे
करमाळा शहर तालुक्यातील शिवभक्त यांनी दिनांक सात डिसेंबर 2022 बुधवारी रोज पुकारलेल्या करमाळा बंदला वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने पाठिंबा दिला आहे. अशी माहिती जिल्हा युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष साहेबराव वाघमारे यांनी पत्रकार शी बोलताना दिली
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा