Breaking

रविवार, ८ जानेवारी, २०२३

मोबाईल चोरणारा आरोपी 24 तासात श्रीगोंदा पोलिसांनी पकडला ........



मोबाईल चोरणारा आरोपी 24 तासात श्रीगोंदा पोलिसांनी पकडला ........


श्रीगोंदा-नितीन रोही

सविस्तर माहिती अशी की गुरुवार दिनांक ५/१/२०२३ रोजी गोपीचंद बाबु राठोड वय 22 वर्षे रा. रामजान ता. मालेगाव जिल्हा नाशीक हल्ली रा. लोणी व्यंकनाथ ता. श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर यांनी श्रीगोंदा पोलीस स्टेशनला फिर्याद दिली होती.की  पहाटे कोणीतरी आज्ञात चोरट्याने फिर्यादी राहत असलेल्या कोपीमधुन 45000/- किंमतीचे तीन मोबाईल हँडसेट फिर्यादिच्या संमतीशीवाय लबाडीच्या इराद्याने कोणीतरी आज्ञात चोरट्याने चोरुन नेले आहेत अशी फिर्याद दिल्या वरुन श्रीगोंदा पोलीस स्टेशनला गुन्हा रजि नंबर 14/2023 भा.द.वि.क 380 प्रमाणे गुन्हा दाखल केला होता.

सदर गुन्ह्याचा तपासात श्रीगोंदा पोलीस निरीक्षक रामराव ढिकले  यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, श्रीगोंदा पोलीस स्टेशन हद्दीतील लोणी व्यंकनाथ येथे मोबाईलची चोरी ही ऋषीकेश पोपट काळे रा. लिपनगाव ता. श्रीगोंदा याने केली असुन तो श्रीगोंदा बस स्टॅन्ड येथे येणार आहे,अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी श्रीगोंदा बस स्टॅन्ड येथे सापळा लावणेबाबत सांगीतले. गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी श्रीगोंदा येथील बस स्टॅन्ड  सापळा लावुन संशयीत ईसम ऋषीकेश काळे  यास श्रीगोंदा बस स्टॅन्ड येथे ताब्यात घेतले. त्याचेकडे मोबाईल चोरीबाबत कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आणि त्याचेकडुन पोलिसांनी गुन्ह्यातील 45000/- रू किंमतीचे 3 मोबाईल व ईतर 113000/- रुपये किंमतीचे 18 मोबाईल असे एकुण 158000/- रू किंमतीचे 21 मोबाईल हॅन्डसेट हस्तगत करण्यात आले आहेत. सदर गुन्ह्याचा तपास पो.ना. इंगावले हे करीत आहेत.

सदरची कारवाई  राकेश ओला पोलीस अधिक्षक,प्रशांत खैरे अप्पर पोलीस अधिक्षक, आण्णासाहेब जाधव उपविभागीय पोलीस अधिकारी, यांचे मार्गदर्शनाखाली श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले, पोसई समिर अभंग, स. फो. अंकुश ढवळे, पो.ना / गोकुळ इंगावले, पो.कॉ / अमोल कोतकर, पोकों / रविंद्र जाधव, पोकों/देवकाते पोकॉ गणेश साने, पोकों/संभा गर्जे यांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा