भाजपा युवा मोर्चाच्या तालुका उपाध्यक्षपदी राजेश पाटील सिरसाट यांची निवड
नांदेड जिल्हा प्रतिनिधी
बालाजी सिरसाट
लोहा : उमरा येथील सामाजिक कार्यकर्ते राजेश नागोराव पाटील सिरसाट यांची भारतीय जनता पार्टीच्या लोहा तालुका युवा मोर्चाच्या पदाधिकारी कार्यकारिणीत खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली लोहा तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.नुकतेच निवड झाल्याचे नियुक्तीपत्र जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर व महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा प्रणिता (देवरे) चिखलीकर यांच्या हस्ते देण्यात आले.
यावेळी जिल्हा सरचिटणीस गंगाधर जोशी ग्रामीण युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख भाजपा तालुकाध्यक्ष आनंदराव पाटील ढाकणीकर भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष बंडू पाटील वडजे किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बालाजी पाटील मारतळेकर माजी नगराध्यक्ष किरण वट्टमवार माजी सभापती खुशाल पाटील,केशवराव मुकदम ,गणेश पाटील उबाळे ,शिवराज पाटील जोमेगावकर,नरेंद्र गायकवाड,बालाजी खिल्लारे,प्रदीप सावळे, लोकडेश्वर शिंदे आदींची उपस्थिती होती.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा