Breaking

गुरुवार, ५ जानेवारी, २०२३

राम पवार यांच्या वाढदिवसानिमित्त २०० जणांचे रक्तदान



राम पवार यांच्या वाढदिवसानिमित्त  २०० जणांचे रक्तदान


टेंभुर्णी (प्रतिनिधी) :-  युवा नेते राम पवार यांच्या वाढदिवसानिमित्त साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सभागृह येथे माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे यांच्या हस्ते बजरंग बलीच्या प्रतिमेचे पूजन करून रक्तदान   कार्यक्रमास सुरुवात झाली. ५ जानेवारी रोजी सकाळी ९ ते सायंकाळी  ५  वाजेपर्यंत   रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तरूण कार्यकर्त्यांची उस्फूर्त गर्दी रक्तदान करण्यासाठी दिसून आली. समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या भावनेतून अशा तरूण कार्यकर्त्यांनी आपले वाढदिवस साजरे केले तर गरजू  लोकांना रक्त पुरवठा करण्यास कोणतीही अडचण येणार नाही. याचा आदर्श सर्व समाज बांधवांनी घेऊन "रक्तदान सर्व श्रेष्ठ दान"समजून  समाजाप्रती कृतज्ञता व्यक्त करावी असा संदेश यावेळी गेला.


 आपण सर्वांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपत अनेकांचे जीव वाचवण्यासाठी मदत करून आणि माणुसकीचे दर्शन घडवले. या रक्तदान शिबिरात २००  इतक्या रक्तदात्यांनी सहभाग घेऊन रक्तदान केले या रक्तदान शिबिरात रक्त संकलनासाठी कुर्डूवाडी ब्लड सेंटर, कुर्डूवाडी या रक्तपेढीने सहकार्य केले.          
यावेळी माढा वेल्फेअर फाउंडेशन चे अध्यक्ष धनराज शिंदे , भाजपचे तालुकाध्यक्ष योगेश बोबडे , सरपंच प्रमोद कुटे ,  टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर ,काँग्रेसचे अध्यक्ष ऋषिकेश बोबडे , शिवसेनेचे तालुकाप्रमुख मधुकर देशमुख ,  भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष उमेश पाटील , टेंभुर्णी प्रेस क्लबचे नूतन अध्यक्ष डी एस गायकवाड सर, टेंभुर्णी ग्रामपंचायत सदस्य जयवंत पोळ , ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब महाडिक , विकास धोत्रे , रामभाऊ शिंदे ,  राजकुमार धोत्रे , ॲड . मंगेश देशमुख , विजयकुमार कोठारी , परमेश्वर खरात , महेंद्र वाकसे , डॉ . राहुल पाटील , राहुल टिपाले , शिवाजी गोंदील , रामभाऊ वाघमारे , ॲड . अजिंक्य संगितराव , टेंभुर्णी प्रेस क्लब चे उपाध्यक्ष सुभाष चव्हाण ,सचिव सचिन होदाडे , माजि अध्यक्ष अनिल जगताप , धनंजय मोरे, गणेश चौगुले, सतिश चांदगुडे,संतोष वाघमारे, आदी उपस्थित होते. .रक्तदाना बरोबरच टेंभुर्णी येथील   उजनी नगर येथील जि.प. शाळेत वही, पेन, शालेय साहित्य वाटप.अण्णाभाऊ साठे पुतळा परिसरात वृक्षारोपण, टेंभुर्णी  ग्रामपंचायत मधील महिला सफाई कर्मचाऱ्यांना साडी वाटप करण्यात आले. 
 यासाठी दिलीप पवार , संतोष धोत्रे , दीपक पवार , लखन पवार , सचिन पवार , कालिदास पवार , विकास सुर्वे , कृष्णा धोत्रे , प्रतीक माने, नितीन चव्हाण, आकाश जगताप , सुरज जाधव , शुभम कांबळे , अजय पवार , योगेश पवार , नाना चौगुले , विशाल पवार ,  बाळासाहेब भोज , सुरज पवार , शंकर चंदनशिवे , विशाल धोत्रे , हनुमंत पवार यांच्यासह राम पवार मित्रपरिवार व जय बजरंग ग्रुप टेंभुर्णी यांनी परिश्रम घेतले.
*माढा तालुक्याचे आमदार बबनदादा शिंदे व धनराज दादा शिंदे यांनी टेंभुर्णी चे वडार समाजाचे युवा नेते राम पवार यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला येऊन कार्यक्रमास शुभेच्छा दिल्याने आज टेंभुर्णी शहरात येणाऱ्या नगरपंचायत च्या निवडणुकीत टेंभुर्णी चे भावी नगरसेवक म्हणून नक्कीच माढा तालुक्याचे आमदार बबनदादा शिंदे यांच्याकडून तिकीट मिळण्यासाठी सहकार्य होणार असल्याची  चर्चा टेंभुर्णी च्या नागरिकांत होत आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा