Breaking

शनिवार, २८ जानेवारी, २०२३

अकोले खुर्द येथील संभाजी अनपट यांना विज्ञान कृतिशील आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान.



अकोले खुर्द येथील संभाजी अनपट यांना विज्ञान कृतिशील आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान.


कन्हेरगांव दि प्रतिनिधी

अकोले खुर्द तालुका माढा येथील  बबनरावजी शिंदे माध्यमिक व कला वाणिज्य व विज्ञान उच्च माध्यमिक विद्यालयातील विज्ञान शिक्षक  संभाजी कोंडीबा अनपट  यांना चालू शैक्षणिक वर्ष  सन् 2022 -23 चा दहावा विज्ञान कृतीशील आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे.
  या पुरस्काराचे वितरण करण्यासाठी महाराष्ट्र राज्य विज्ञान अध्यापक महामंडळ संलग्न सोलापूर जिल्हा विज्ञान मंडळामार्फत श्री दत्तप्रशाला रेल्वे स्टेशन रोड कोळेगाव तालुका -मोहोळ येथे दहावे जिल्हास्तरीय विज्ञान मंडळाचे वार्षिक अधिवेशन या प्रशालेत संपन्न झाले  .
या अधिवेशनामध्ये विज्ञान कृतिशील आदर्श शिक्षक पुरस्कार याचे वितरण जिल्हा विज्ञान मंडळाचे अध्यक्ष शिवाजी चापले यांच्या हस्ते व कार्याध्यक्ष सुनील लिगाडे ,सचिव  प्रियंका आराध्ये , प्राचार्य राजेंद्र ठोंबरे यांच्या प्रमुख उपस्थितीत  विज्ञान शिक्षक  संभाजी अनपट यांना विज्ञान कृतिशील आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला .
          यावेळी प्राचार्य जवानसिंह रजपूत , मुख्याध्यापिका  मधुरा सुरवसे , मुख्याध्यापक अमोल लोंढे ,होनमोठे , अर्चना नेवसे उपस्थित होते.
    याप्रसंगी संस्थेचे सचिव प्राचार्य  राजेंद्र ठोंबरे  यांनीही या कार्यक्रम प्रसंगी त्यांचा सत्कार करून विज्ञान कृतिशील आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन करून प्रोत्साहन दिले .
     पुरस्कार मिळाल्याबद्दल अनपट यांचे आमदार बबनराव शिंदे , आमदार संजयमामा शिंदे , प्राचार्य राजेंद्र ठोंबरे , संचालक जवानसिंह रजपूत यांनी अभिनंदन केले .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा