*माढा विधानसभा मतदारसंघासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून 29 कोटी निधी मंजूर - आ.बबनराव शिंदे*
माढा विधानसभा मतदारसंघ हा माढा,पंढरपूर व माळशिरस या तीन तालुक्यात समाविष्ठ झालेला असून ग्रामीण भागातील रस्त्यांच्या कामासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा-2 मध्ये राज्य निधी व आशियाई विकास बँक अंतर्गत ग्रामीण भागातील रस्त्यांची दर्जोन्नती व सुधारणा करण्यासाठी 29 कोटी निधीची मंजूर करण्यात आला असल्याची माहिती आ.बबनदादा शिंदे यांनी दिली.
याबाबत सविस्तर माहीती देताना आ.शिंदे यांनी सांगितले की,माढा मतदारसंघातील माढा व पंढरपूर तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे. ग्रामीण भागातील रस्त्यांची सुधारणा व दर्जोन्नती करणेसाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या टप्पा - 2 आशियाई विकास बँक अर्थसहाय्य अंतर्गत 3 रस्त्यांना प्रशासकीय मान्यता मिळाली असून मतदारसंघातील 27.02 कि.मी. लांबीच्या रस्त्याची सुधारणा होणार आहे. सदर रस्त्यांच्या कामाची 5 वर्षे नियमित देखभाल व दुरुस्ती करण्यात येणार आहेत. या रस्त्याच्या कामामुळे वाड्यावस्त्या या गावांना, मुख्य रस्त्यांना जोडली जाणार असल्याने दळणवळण सुलभ होण्यास मदत होणार आहे.
माढा मतदारसंघातील ग्रामीण भागातील NH-65, अकोले-बेंबळे-घोटी ते चांभार विहीर या 13 कि.मी. रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी 11 कोटी 72 लाख 94 हजार रुपये निधीची तसेच त्याच्या नियमित देखभालीसाठी 80 लाख 63 हजार रुपये निधीची तरतूद करण्यात आहे. पंढरपूर तालुक्यातील करकंब-नेमतवाडी-पेहे ते नांदोरे (तालुका हद्द) या 11 कि.मी. रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी 12 कोटी 73 लाख 13 हजार रुपये निधीची तसेच त्याच्या नियमित देखभालीसाठी 81 लाख 71 हजार रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे. माळशिरस तालुक्यातील बोरगांव ते 14 सेक्शन या 3 कि.मी. रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी 2 कोटी 54 लाख 37 हजार रुपये निधीची तसेच त्याच्या नियमित देखभालीसाठी 16 लाख 33 हजार रुपये निधीची तरतूद करण्यात आली असून अशी एकुण रस्त्यांचा सुधारणा, दर्जोन्नती व देखभालीसाठी 29 कोटी रुपयेचा निधी मंजूर झालेले आहेत. त्यामुळे सदर रस्त्यांची कामे लवकरच सुरूवात होणार असून या रस्त्याचे खडीकरण, डांबरीकरण व आवश्यक त्या ठिकाणी पुलाची कामे करण्यात येणार असल्याची माहिती आ.बबनदादा शिंदे यांनी दिली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा