“जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशाने गोवंश मांस कत्त्लखन्यावर छापा 3 टेम्पोसह मुद्देमाल जप्त.”
प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद.
मा. उस्मानाबाद शहर पोलीस ठाणे अंतर्गत खिरणीमळा येथे अनाधिकृतरीत्या प्राण्याची कत्तल हांत असल्याची गोपणीय मिळाल्यावरुन मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांच्या आदेशाने मा. सहा पोलीस अधीक्षक उपविभाग काळंब एम. रमेश यांनी दोन पथके तयार करुन छापा मारला ताजे मांस,कातडे, वाळलेले मांस, वाहतुक करणारे 3 टेम्पो आढळून आले.पोलीसांनी 3 टेम्पो,गोवगश मांस व तीन जिवंत जनावरे असा एकुण 26,77,500 ₹ बुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणत 3 आरोपी विरुध्द कलम 279, 283, 188 भा.द.सं सह कलम 5 क 9 (अ) महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमाप्रमाणे पोलीस ठाणे उस्मानाबाद शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उस्मानाबाद जिल्हा हद्दीत अवैध धंद्याची माहिती काढून उस्मानाबाद शहरातील खिरणीमळा कळंब उपविभागाचे दोन पथके तयार करुन उस्मानाबाद येथे छापे मारले. उस्मानाबाद शहरातील फकीरा चौकाजवळ वैराग रोडवर एक आयशर टेम्पो वाहन चालकासह धरुन टेम्पोची तपासणी केली असता सदर टेम्पो मध्ये गोवंश मांस आढळून आले. टेम्पो मधील मांस कोठून आणले टसे विचारले असता जलील कुरैशी यांच्या कत्त्लखान्यातील असल्याचे सागिंतले.
टेम्पो चालकाने दिलेल्या सहाय्यक पोलीस अधीक्षक उपविभाग काळंब सोबत उपविभाग कळंब एम.रमेश येथील दोन्ही पथक, पोलीस मुख्यालय उस्मानाबाद येथील RCP] QRT पथक व पोलीस ठाणे उस्मानाबाद शहर पोनि उस्मान शेख व पोलीस स्टाफ सह दि.16.02.2023 रोजी 17.00 वा. सु. खिरणीमळा खाटीक गल्ली येथील कत्तलखान्यात छापा मारला असता तेथे कापण्यासाठी लागणारे साहित्य व बाजूस असलेल्या वाहनामध्ये मांस असे आढळून आले. या कारवाईत एकुण 3 टेम्पो- 19,00,000 ₹ गांवेश मांस-7,57,500 ₹, 3 जिवंत गांवंशी जनावरे 20,000 ₹ असे एकुण 26,77,500 ₹ रुपयाचे मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे. व 03 आरोपी विरुध्द कलम 279, 283, 188 भा.द.सं सह कलम 5 क 9 (अ) महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमाप्रमाणे पोलीस ठाणे उस्मानाबाद शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी मा. जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांच्या आदेशाने मा. सहाय्यक पोलीस अधीक्षक उपविभाग काळंब सोबत उपविभाग कळंब एम.रमेश, उस्मानाबाद शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक- उस्मान शेख, सपेनि- काबंळे, पठाण,चव्हाण पोउपनि- पुजरवाड, चाटे, पोलीस ठाणे स्टाफसह यांनी केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा