पिंपळनेर ग्रामपंचायत कार्यालयाचे लोकार्पण ...
विविध विकास कामांचे उद्घाटन......
पिंपळनेर भुइंजे रस्ता 47 लाख तर पशुवैद्यकीय दवाखान्यासाठी 40 लाख रुपये मंजूर.....
आमदार बबनदादा शिंदे
बेंबळे।प्रतिनिधी। मुकुंद रामदासी
ग्रामपंचायत सक्षमीकरण अभियाना अंतर्गत पिंपळनेर ता.माढा येथील ग्रामपंचायत कार्यालयाचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा तसेच विविध विकास कामांचे उद्घाटन माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबनराव शिंदे यांच्या हस्ते व गटविकास अधिकारी डॉ.संताजी पाटील, माजी उपसभापती तुकाराम ऊर्फ बंडूनाना ढवळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी जलजीवन मिशन,१५ वा वित्त आयोग, दलीत वस्ती सुधार योजना, विकास कामे व घंटागाडी शुभारंभ, ग्रामपंचायत कार्यालय उद्घाटन व लोकार्पण तसेच ऑनलाईन लाईन उतारा देणे या कामाचा शुभारंभ यावेळी करण्यात आला, बेंबळे जिल्हा परिषद गटातील पिंपळनेर हा पंचायत समिती गण आहे.
याप्रसंगी बोलताना आ. बबनराव शिंदे म्हणाले की,पिंपळनेर ग्रामपंचायतीला विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला असून यापुढेही निधी कमी पडू दिला जाणार नाही . पिंपळनेर ते भोईंजे रस्त्यासाठी ४७ लाख रुपये तर पशुवैद्यकीय दवाखान्यासाठी ४० लाख रूपयांचा निधी मंजूर झाला असून लवकरच हि कामे सुरू होतील. पिंपळनेर ग्रामपंचायतीचे काम कौतुकास्पद असून सरपंच,उपसरपंच ग्रामविकास अधिकारी व सर्व सदस्यांनी आणखी चांगली कामे करून विकासासाठी प्रयत्न करावा असे आ. बबनराव शिंदे यांनी आवर्जून सांगितले. याप्रसंगी बेंबळे जिल्हा परिषद सदस्य प्रतिनिधी तथा माढा पंचायत समितीचे माजी उपसभापती बंडू नाना ढवळे,गटविकास अधिकारी डॉ.संताजी पाटील यांनीही आपली मनोगते व्यक्त केली.
यावेळी विस्तार अधिकारी भारत रेपाळ ,सरपंच प्रतिनिधी अभिमन्यू लोंढे,ग्राम विकास अधिकारी तात्यासाहेब पाटील,पं.स.सदस्य प्रतिनिधी सतीश पाटील,माजी जि.प.सदस्य संजय डांगे, बिभीषण डांगे,अभिमान लोंढे, पोलीस पाटील राहुल पेटकर, उपअभियंता पांडुरंग हांडे, सतीश आवारे,गुरुदेव पाटील,औदुंबर पाटील,विजयकुमार लोंढे,अतुल क्षीरसागर, हनुमंत जाधव, महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघाचे पुणे विभागीय सचिव विजय कुमार माढेकर, प्रताप गवळी, धनाजी परकाळे यांच्यासह सर्व ग्रा.पं.सदस्य,महिला,ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते .
चौकट.....
ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या प्रयत्नामुळे उत्कृष्ट ग्रा.पं. कार्यालय तयार झाले - बीडीओ डॉ.संताजी पाटील
विकासासाठी राजकारण बाजूला ठेवून एकत्र येणारे गाव म्हणून पिंपळनेरचा नावलौकिक आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संकल्पनेतून ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व ग्रामविकास अधिकारी यांच्या प्रयत्नाने पिंपळनेर ग्रामपंचायतीचे कार्यालय अतिशय सुसज्ज व उत्कृष्ट झाले आहे. हे सर्व ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी तात्यासाहेब पाटिल यांच्या प्रयत्नाने झाले असल्याचे गटविकास अधिकारी डॉ.संताजी पाटील यांनी आवर्जून सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन ग्रामविकास अधिकारी तात्यासाहेब पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन लोंढे यांनी केले.
फोटो... पिंपळनेर तालुका माढा येथील ग्रामपंचायत कार्यालयाचे लोकार्पण व विविध विकास कामाच्या उद्घाटन प्रसंगी आमदार बबनदादा शिंदे , पिंपळनेर ग्रामस्थ व इतर मान्यवर.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा