कान्हापुरी येथे विविध उपक्रमाने शिवजयंती साजरी
51नागरिकांचे रक्तदानः मैदानी खेळाचे आयोजन
बेंबळे। प्रतिनिधी। AJ 24Taas News मुकुंद रामदासी
कान्हापुरीचे सरपंच व भैरवनाथ प्रतिष्ठानचे प्रमुख प्रेमभैया चव्हाण यांचे प्रमुख नियोजनाखाली कान्हापुरी येथे रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर व मैदानी खेळाच्या स्पर्धेचे आयोजन करून शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सर्वप्रथम सकाळी सोलापूर जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजीतभैय्या बबनराव शिंदे यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करून पुष्पहार व श्रीफळ अर्पण करण्यात आले.
याप्रसंगी सरपंच प्रेम चव्हाण यांचे सहित करकंब चे उपसरपंच आदिनाथ देशमुख बार्डिचे सरपंच अभिजीत कवडे, जळवली चे सरपंच ज्योतीराम मदने, उंबरेचे ब्रह्मदेव कानगुडे, हरिनामा कानगुडे डॉक्टर सतीश चव्हाण, जगन्नाथ पाटील बलभीम पाटील बापूराव पवार आदी मान्यवर उपस्थित होते .यानंतर रणजीतभैया शिंदे यांच्या हस्ते रक्तदान शिबिर व मैदानी खेळाच्या स्पर्धांचे उद्घाटन करण्यात आले,
या विशेष कार्यक्रमांच्या संदर्भात रंजीत भैया शिंदे यांनी सर्व नागरिकांना व सरपंच प्रेम भैया चव्हाण यांचे विशेष अभिनंदन केले व नेहमी प्रमाणे गावच्या कोणत्याही समस्यासाठी सहकार्य करण्याचे याप्रसंगी आश्वासन दिले. याप्रसंगी विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याचे संचालक पोपटराव चव्हाण, मोती गोसावी, राणू शिंदे ,श्रीपती शिंदे डॉक्टर अनिल शिंदे भारत शिंदे पोपट फराडे भगवान फराडे महादेव कारंडे अनिल फराडे बालाजी फराडे धर्मराज गायकवाड, सचिन सल्ले, उत्तम शिंदे सागर शिंदे प्रकाश गोसावी व शेकडो तरुण युवक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते, रक्तदान शिबिरात 51 नागरिकांनी रक्तदान केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा