Breaking

शनिवार, ११ मार्च, २०२३

माढा येथील वरीष्ठ स्तर दिवाणी न्यायालयासाठी व न्यायाधीश निवासस्थानासाठी अर्थसंकल्पात निधी ची तरतूद- आ.रणजितसिंह मोहिते पाटील



माढा येथील वरीष्ठ स्तर दिवाणी न्यायालयासाठी व न्यायाधीश निवासस्थानासाठी अर्थसंकल्पात निधी ची तरतूद- आ.रणजितसिंह मोहिते पाटील


    टेंभुर्णी/  प्रतिनिधी  AJ 24Taas News  गणेश चौगुले 

माढा येथे वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालय स्थापन करण्यासंदर्भात शासन निर्णय पारित झालेनंतर २०२३-२४च्या अर्थसंकल्पात पदनिर्मीती चा शासन निर्णय झाल्यानंतर  न्यायालय स्थापना व इतर अनुषंगिक कामासाठी निधी व न्यायाधिशांच्या निवासस्थानासाठी निधीची तरतूद करण्यात आल्याची माहिती आ.रणजितसिंह मोहिते पाटील यांनी दिली.
आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे माढा येथील वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयासाठी १९ पदाची निर्मिती करण्यात आली होती त्यानुसार दिवाणी वरिष्ठस्तर न्यायाधिश,अधिक्षक,सहाय्यक अधिक्षक,लघुलेखक ग्रेड२,वरिष्ठ लिपीक,कनिष्ठ,लिपीक,बेलीफ,शिपाई,पहारेकरी सफाईदार आदि १९ पदांची निर्मीती करण्यात आली होती . अर्थसंकल्पात माढा,केज,अहेरी या न्यायालयांसाठी एकूण २ कोटी ७० लाख रुपयांची निधी ची तरतूद या अर्थसंकल्पात शासनाने केली आहे.
 त्याचबरोबर माढा येथील न्यायाधीशांच्या निवासस्थानासाठी लागणाऱ्या निधी साठी आ.मोहिते पाटील यांनी मागणी केलेली होती त्याप्रमाणे या अर्थसंकल्पात न्यायाधिशांच्या निवासस्थानासाठी १ कोटी ३२ लाख ४९ हजार रुपयांची तरतूद केली आहे.
      आ.मोहिते पाटील यांच्या पाठपुरावा मुळे माढा न्यायालयासाठी पदनिर्मीती, स्थापना व इतर अनुषंगिक कामे  आणि न्यायाधिशांसाठी निवासस्थान या दोन्ही महत्वाच्या मागण्यांसाठी निधीची तरतूद झाली आहे.त्यामुळे माढा वकिल संघानी आ.मोहिते पाटील यांचे आभार व्यक्त केले आहेत.

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा