विठ्ठलराव शिंदे पतसंस्थेच्या चेअरमनपदी संतोष डिग्रजे व व्हाईस चेअरमनपदी संभाजी थिटे यांची निवड
बेंबळे।प्रतिनिधी।
विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना सेवकांची सहकारी पतसंस्था मर्या, गंगामाईनगर, पो.पिंपळनेर,ता.माढा,जि.सोलापूर या पतसंस्थेच्या नवनिर्वाचीत मा.संचालक मंडळाचे पहिल्या सभेत कार्यकारी संचालक संतोष डिग्रजे यांची चेअरमन पदी व संभाजी थिटे केन मॅनेजर यांची व्हाईस चेअरमनपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
विठ्ठलराव शिंदे कामगार पतसंस्थेची सन 2022-23 ते 2027-28 या कालावधीसाठीची पंचवार्षिक निवडणूक दि.28/02/2023 रोजी बिनविरोध झाली. पतसंस्थेचे एकूण 16 संचालक बिनविरोध निवडून आलेले आहेत. शुक्रवार दि.10/03/2023 रोजी दुपारी 12.30 वा. निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहकारी अधिकारी श्रेणी-1 एस.आर.मुंढे यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या नवनिर्वाचीत संचालक मंडळ सभेत विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे कार्यकारी संचालक संतोष डिग्रजे यांची पतसंस्थेच्या चेअरमन पदी व केन मॅनेजर संभाजी थिटे यांची व्हाईस चेअरमनपदी बिनविरोध निवड झाली.
सदरप्रसंगी संतोष डिग्रजे यांची चेअरमनपदी निवड झालेबद्दल जनरल मॅनेजर (प्रोसेस) पी.एस.येलपले यांनी शाल श्रीफळ देवून त्यांचा सन्मान केला. तसेच संभाजी थिटे यांची व्हाईस चेअरमनपदी निवड झालेबद्दल वर्क्स मॅनेजर ए.डी.ढेकाने यांनी शाल श्रीफळ देवून त्यांचा सन्मान केला.
याप्रसंगी नुतन चेअरमन संतोष डिग्रजे म्हणाले की, विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन आ.बबनराव शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली विठ्ठलराव शिंदे पतसंस्थेची स्थापन सन 2009 मध्ये करण्यात आलेली आहे. सध्या पतसंस्थेचे 703 सभासद असून पतसंस्थेचे भागभांडवल 14 कोटी 57 लाख आहे. सभासदांना आजअखेर 15 कोटी 74 लाखाचे कर्ज वाटप करण्यात आलेले आहे. सभासदांना 8 टक्के व्याज दराने मध्यम मुदत कर्ज रू.9 लाख व तातडीचे कर्ज रू.20 हजार वाटप करण्यात येत आहे. पतसंस्थेमार्फत गत आर्थिक वर्षामध्ये सभासदांना 10 टक्के लाभांश वाटप करण्यात आलेला आहे अशी माहीती नुतन चेअरमन संतोष डिग्रजे यांनी दिली.
तसेच याप्रसंगी विठठ्लराव शिंदे साखर कारखान्याचे कामगार संघटनेचे अध्यक्ष अनिल वीर व उपाध्यक्ष दिनेश शिंदे यांचे वतीने नुतन चेअरमन व व्हाईस चेअरमन यांचा सन्मान करण्यात आला.
सदर प्रसंगी पतसंस्थेचे संचालक अनिल जगताप,दिलीप लव्हटे,रमेश खेडकर,बालाजी गिड्डे,तानाजी लोंढे,सुनिल शिंदे,नानासो डुबल,पांडूरंग बागल,रामचंद्र डांगे, पांडूरंग लोंढे, तानाजी व्हनमाने,शरद वाघमारे, चंद्रकांत कुटे,शहाजी गोसावी व कारखान्याचे खातेप्रमुख जनरल मॅनेजर एस.आर.यादव, जनरल मॅनेजर(प्रोसेस)पी.एस.येलपले,वर्क्स मॅनेजर ए.डी. ढेकाने, चिफ इंजिनिअर एस.डी.कैचे, हेड टाईम किपर आर.एन.आत्तार, सुरक्षा अधिकारी एफ.एम.दुंगे व पतसंस्थेचे सचिव यु.डी.माळवदकर उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा