माजी सभापती बंडू नाना ढवळे यांच्ये वडील बाळासाहेब विठोबा ढवळे यांचे अल्पशा आजाराने दुःख निधन.
टेंभुर्णी (प्रतिनिधी) सापटणे (टें) ता.माढा येथील बागायतदार माजी उपसभापती तथा माढा तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष तुकाराम ऊर्फ बंडू नाना ढवळे यांचे वडील बाळासाहेब विठोबा ढवळे यांचे वयाच्या 75 व्या वर्षी अल्पशा आजाराने आज सकाळी निधन झाले. कुटुंबात व परिसरात ते आप्पा या नावाने ओळखले जात होते. व ते अतिशय शांत संयमी व मितभाषी होते. त्यांच्या पश्चात तीन मुले सुना नातवंडे असा परिवार आहे.त्यांच्या जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा