Breaking

शुक्रवार, १७ मार्च, २०२३



यशस्वी होण्यासाठी कष्ट करण्याची तयारी ठेवा - देशमुख .


कन्हेरगांव/  प्रतिनिधी धनंजय मोरे 

यशस्वी होण्यासाठी कष्ट करायची तयारी ठेवा , यश तुमच्यापासून लांब नाही , असे प्रतिपादन एमपीएससी  परीक्षेतुन पीएसआय पदी निवड झालेले गणेश देशमुख यांनी केले .
         टेंभुर्णी तालुका माढा येथे गुरुवारी 16 मार्च रोजी सायंकाळी गणेश देशमुख यांच्या सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन नाना - भैय्या युवा मंचच्या वतीने करण्यात आले होते . यावेळी ते बोलत होते. 
        एमपीएससी परीक्षेतून पीएसआय पदी निवड झाल्याबद्दल गणेश प्रभाकर देशमुख व सार्वजनिक बांधकाम विभाग व पाटबंधारे विभाग या शासनमान्य संघटनेच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी बापुसाहेब शिंदे यांची निवड झाल्याबद्दल टेंभुर्णी ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
        यावेळी देशमुख अँड देशमुख कंपनीचे बाळासाहेब देशमुख , उद्योजक सुरज देशमुख ,  रावसाहेब नाना देशमुख , ग्रामपंचायत सदस्य गणेश केचे , उपसरपंच धनंजय गोंदील , शिवसेनेचे सुरेश लोंढे , काँग्रेसचे शहराध्यक्ष सोमनाथ कदम , दशरथ देशमुख ,  गोरख बाप्पा देशमुख , बंकट देशमुख ,  वैभव महाडिक , नानासाहेब देशमुख , सिद्धेश्वर देशमुख , अमोल धोत्रे ,  शैलेश ओहोळ , प्रशांत देशमुख , कल्याण पाटील , धनंजय लोकरे  ,नाना भोसले , राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष धनाजी भरगंडे , हनुमंत देशमुख , सतिश चांदगुडे , बिभीषण देशमुख ,ॲड . योगेश देशमुख ,  लखन माने , भाऊसाहेब देशमुख , लखन हवलदार , आप्पा हवलदार ,  आकाश सुतार , विठ्ठल साळुंखे , रणजीत देशमुख , प्रताप देशमुख ,  बाळासाहेब देशमुख , समाधान देशमुख , अमित देशमुख , पप्पू देशमुख , आकाश देशमुख , सोमनाथ देशमुख , बिट्टू केचे , शुभम देशमुख , प्रथमेश खंदारे , प्रशांत डोके - पाटील , दादा देशमुख , रंजीत आटकळे  , विजय देशमुख , गौरव देशमुख आदी उपस्थित होते. 
     प्रारंभी गणेश देशमुख यांची पीएसआय पदी निवड झाल्याबद्दल त्यांची टेंभुर्णी शहरातून घोड्यावरून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.
       यावेळी अमोल धोत्रे , सोमनाथ कदम , सुरेश लोंढे , ॲड. योगेश देशमुख , बापूसाहेब शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले .
      सूत्रसंचालन राजाभाऊ पाटील यांनी तर आभार प्रदर्शन रावसाहेब देशमुख यांनी मानले. 

---------------------------

पीएसआय पदी निवड झाल्याबद्दल गणेश देशमुख यांचा सत्कार करताना रावसाहेब नाना देशमुख , उद्योजक सुरज देशमुख , गणेश केचे , गोरख देशमुख , प्रशांत देशमुख आदी दिसत आहे.....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा