बेंबळे - वेताळवाडी येथे किरकोळ कारणावरुन गोळीबार....
मोटर सायकलने माझ्या मुलाला का ठोसाळले याचा जाब विचारल्या च्या कारणावरुन धक्काबुक्की , गोळीबार व रात्री जीवे मारण्याची धमकी....
बेंबळे/प्रतिनिधी
माढा तालुक्यातील बेंबळे येथे किरकोळ कारणावरुन गोळीबार केल्याची घटना काल सायंकाळी आठच्या सुमारास घडली
याची सविस्तर हकीगत अशी की, शनिवार दि.२२ रोजी सायंकाळी 07/45 वा. चे सुमारास बेंबळे गावातील वेताळवाडी चौकातील गणपती मंदिराजवळ रोडवर यातील आरोपी सोमनाथ भारत कांबळे यास यातील फिर्यादी शरद रामचंद्र कोळी यांनी त्यांचा मुलगा रुद्रा याला सकाळी मोटरसायकलचा धक्का का दिला अशी विचारणा केली असता त्यावरुन चिडुन जावून आरोपी याने फिर्यादी यास शिवीगाळ, दमदाटी करुन कोयत्याने मारुन किरकोळ जखमी केले आहे. तसेच भैया सुनिल ताकतोडे शंकर लक्ष्मण कांबळे, तेजस संजय कांबळे, वैभव नामदेव कांबळे सर्व रा. वेताळवाडी, बेंबळे ता. माढा जि. सोलापूर यांनी फिर्यादी यांना शिवीगाळी, दमदाटी करुन हाताने लाथाबुक्कयाने मारहाण केली आहे. तसेच थोडया वेळानेच त्याच ठिकाणी सोमनाथ भारत कांबळे, त्याचा चुलत भाउ शंकर लक्ष्मण कांबळे असे दोघानी येवून शंकर कांबळे याने त्याचे हातातील पिस्तुल मधुन हवेत एक गोळी झाडून भांडण सोडवणारे फिर्यादीचे चुलत भाऊ गणपत कुर्मूदास कोळी, रावसाहेब दत्तात्रय कोळी यांचेवर पिस्तुल रोखुन त्याचा धाक दाखवून त्यांना शिवीगाळ दमदाटी करुन त्यांना जिवे मारण्याची धमकी देवून आज रात्री 12/00 वा. पर्यंत एकाला तरी ठेवत नाही.,अशी जिवे मारण्याची धमकी दिली आहे, अश्या मजकुराच्या फिर्यादी वरून टेंभुर्णी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्यातील आरोपीना करमाळा उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.विशाल हिरे,टेंभुर्णी पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि जोग व डी. बी. पथकातील पोलीस उपनिरीक्षक कुलदीप सोनटक्के, पोना साठे , पोकॉ कांबळे, पोकाँ तुकाराम माने- देशमुख, पोकॉ इंगोले, पोना भानवसे, चापोहेकॉ/ क्षिरसागर पो .कॉ/ खंडागळे यांनी गुन्हा दाखल झाल्यापासून पाच तासाच्या आत वरील आरोपींचा शिताफीने पाठलाग करून त्यांना चव्हाणवाडी ता. माढा येथे पकडून पोलीस ठाण्यास घेऊन येऊन पुढील तपासकामी सपोनि जोग यांच्या समक्ष हजर केले . याची टेंभुर्णी पोलीस मध्ये नोंद करण्यात आली असुन आरोपीवर भा.द.वि कलम 143, 147, 148, 149, 324, 336, 504, 506 सह आर्म ॲक्ट कलम 3, 25, 27 व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135 प्रमाणे गुन्हा दाखल आहे .
फोटो.. गुन्ह्यात वापरण्यासाठी तयार ठेवलेली हत्यारे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा