Breaking

बुधवार, १० मे, २०२३

टेंभुर्णी येथे 12 मे रोजी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन**ग्रामीण भागातील नागरिकांनी लाभ घेण्याचे निलेश ताटे यांचे आव्हान*


*टेंभुर्णी येथे 12 मे रोजी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन*

*ग्रामीण भागातील नागरिकांनी लाभ घेण्याचे निलेश ताटे यांचे आव्हान*


टेंभुर्णी प्रतिनिधी दि.10      रामरत्न मेडिकल टेंभुर्णी आयोजित पुणे अंधजन मंडळाचे एच. व्ही. देसाई हॉस्पिटल मोहम्मद वाडी हडपसर, पुणे संचलित मोफत नेत्र तपासणी शिबिर दिनांक 12 मे 2023 सकाळी नऊ वाजल्यापासून ते दुपारी दोन वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले असून या मोफत नेत्र तपासणी शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन रामरत्न मेडिकलचे मालक निलेश ताटे यांनी केले आहे.
या मोफत नेत्र तपासणी शिबिरामध्ये, मोफत नेत्र तपासणी , मोफत चष्मा नंबर काढून मिळेल , मोफत रक्तदाब तपासणी,  मोफत शुगर तपासणी,  पिवळे रेशन कार्डधारकांचे मोतीबिंदूचे ऑपरेशन मोफत करून दिले जाणार आहे ...हे शिबिर रामरत्न मेडिकल बेंबळे चौक टेंभुर्णी तालुका माढा येथे दिनांक 12 मे 2023 रोजी सकाळी नऊ ते दोन वाजेपर्यंत होणार असून या शिबिराचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा असे आवाहन रामरत्न मेडिकलचे मालक निलेश ताटे यांनी केले आहे


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा