Breaking

मंगळवार, २३ मे, २०२३

जिल्ह्यातील साखर कारखान्याचे चेअरमन व कार्यकारी संचालक यांची विठ्ठलराव शिंदे कारखान्यावर आमदार बबनदादांनी बोलावली बुधवारी 24 मे रोजी बैठक....मुकादम व ठेकेदार यांच्या अन्यायकारक फसवणुकी संदर्भात होणार सखोल चर्चा ...


जिल्ह्यातील साखर कारखान्याचे चेअरमन व कार्यकारी संचालक यांची विठ्ठलराव शिंदे कारखान्यावर आमदार बबनदादांनी बोलावली बुधवारी 24 मे रोजी बैठक....

मुकादम व ठेकेदार यांच्या अन्यायकारक फसवणुकी संदर्भात होणार सखोल चर्चा ...

 बेंबळे। प्रतिनिधी।  / AJ24Taas News Maharashtra

मुकुंद रामदासी बेंबळे    ***************************

सोलापूर जिल्ह्यातील सर्व खाजगी व सहकारी साखर कारखान्यांचे चेअरमन, कार्यकारी संचालक, मुख्य शेतकी अधिकारी व संमंधीतांची  बैठक पिंपळनेर येथील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्यावर बुधवार दिनांक 24 मे रोजी सकाळी अकरा वाजता आयोजित करण्यात आली असल्याची माहिती कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष आमदार बबनदादा शिंदे यांनी दिली आहे. 
      सध्या सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे ऊस तोडणी वाहतुकीसाठी वाहन मालकांच्या बरोबर व वाहन मालकांचे ऊस तोडणी कामगार व मुकादम यांचे बरोबर करार चालू आहेत. यापूर्वी मुकादम  व ठेकेदारांनी वाहन मालकाकडून मजूर पुरवठा करण्याचे कबूल करून लाखो रुपये उचल घेऊन मजूर न देता नंतर वाहन मालकाची फसवणूक केलेली आहे ,त्यामुळे अनेक वाहन मालकांची घरे उध्वस्त झाली आहेत, अनेकांना कर्जबाजारी व्हावे लागले आहे तर काही जणांना या ऊस तोडणी मजुरांच्या कडूनच ॲट्रॉसिटी, फसवणूक,  अत्याचार अशा गुन्ह्याला सामोरे जाऊन शिक्षा भोगायची पाळी आली आहे. तर एखादा ऊस वाहतूक वाहान मालक टोळी आणायला गेल्यानंतर या मुकादम ठेकेदार व मजुरानी त्यांच्या प्रदेशात जीव देखील घेतला आहे. या संदर्भात राज्य पातळीवर यापूर्वीच आमदार बबनदादा शिंदे यांनी आवाज उठवलेला आहे व लाखो रुपये कोट्यावधी रुपये ची फसवणूक करणाऱ्या ठेकेदार व  मुकादम यांच्या अन्यायी व जुलमी वर्तणुकीला महाराष्ट्र पोलिसांनी कठोर शासन करावे याबाबतीत आमदार बबनदादांनी आवाज उठवलेला आहे,  यापुढे अशा घटना परत परत घडू नयेत, आर्थिक नुकसान करणाऱ्या व पैसे बुडवणाऱ्या मुकादम व ठेकेदारांच्या विरुद्ध  योग्य ती कठोर पोलीस कारवाई व्हावी या उद्देशाने व तसेच फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांना, वाहन मालकांना  कायद्यानुसार योग्य तो न्याय मिळवून देण्याच्या उद्देशाने चर्चा करण्याच्या संदर्भात बुधवारी  सकाळी 11 वाजता आमदार बबनदादा शिंदे यांनी विठ्ठल राव शिंदे सहकारी साखर कारखान्यावर, आर्या पब्लिक स्कूल येथे मीटिंग आयोजित केली आहे. बैठकीनंतर सर्वांची भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे असे कार्यकारी संचालक संतोष डिग्रजे यांनी कळवले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा